भारतातील वाहन स्क्रॅपेज धोरणाच्या यशामुळे आतापर्यंत १.२ लाख वाहने स्क्रॅप झाली आहेत. सरकारी वाहनांच्या स्क्रॅपिंगचे लक्ष्य वाढवण्यात आले आहे. ऑटोमोबाईल कंपन्या नवीन गाडी खरेदीवर मोठी सवलत देत आहेत.
Ad
scrap your old car 2
Image Credit source: freepik
Follow us on
देशात वाहन स्क्रॅपेज धोरण लागू झाल्यापासून, आतापर्यंत १.२ लाख वाहने स्क्रॅप करण्यात आली आहेत. यापैकी सुमारे ६१,००० सरकारी वाहने ही १५ वर्षांपेक्षा जास्त जुनी होती.
तसेच येत्या मार्च २०२५ पर्यंत साधारण ९०,००० जुनी सरकारी वाहने स्क्रॅप करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. हे आकडे नोंदणीकृत स्क्रॅपिंग केंद्रांमधून गोळा केले गेले आहेत.
आता ऑटोमोबाईल कंपन्याही रस्त्यावरून जुनी वाहने हटवण्याच्या प्रयत्नात सामील झाल्या आहेत. ऑटोमोबाईल कंपन्यांनी जुन्या गाड्या स्क्रॅप करणाऱ्या ग्राहकांना नवीन गाड्यांवर १.५% ते ३.५% पर्यंत सूट देण्याचे मान्य केले आहे.
तसेच, काही आघाडीच्या लक्झरी कार उत्पादकांनी सुमारे २५,००० रुपयांची सूट देण्यास सहमती कंपन्यांनी दर्शवली आहे. नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली २७ ऑगस्ट रोजी झालेल्या सोसायटी ऑफ ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम) सोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
जुन्या वाहनांच्या स्क्रॅपिंगला प्रोत्साहन देण्यासाठी ऑटोमोबाईल कंपन्यांनी उचललेले हे एक मोठे पाऊल असल्याचे म्हटले जात आहे. जुनी वाहने स्क्रॅप केल्याने बाजारात नवीन वाहनांची मागणी वाढेल. यामुळे प्रदूषणावरही नियंत्रण येईल.
जर तुम्ही तुमची जुनी गाडी भंगारात टाकली तर नवीन गाडी खरेदी केल्याने तुम्हाला काय फायदा होईल? हे आपण जाणून घेणार आहोत.
वाहन स्क्रॅप धोरण २०२१ नुसार कोणत्याही नोंदणीकृत वाहन स्क्रॅपिंग प्लांटमध्ये जुनी गाडी स्क्रॅप केल्यावर प्रमाणपत्र दिले जाते. जर तुम्ही नवीन कार खरेदी केली तर या प्रमाणपत्राच्या मदतीने तुम्हाला कारच्या वाहन करावर २५ टक्क्यापर्यंत सूट मिळू शकते.
१० लाख रुपये किंवा त्याहून अधिक किमतीच्या गाड्यांवर आरटीओकडून १० टक्के शुल्क आकारले जाते. यामुळे तुम्हाला १,००,००० रुपये वाहन कर भरावा लागतो. पण स्क्रॅपिंग सर्टिफिकेट दाखवून तुम्ही यातील २५ हजार रुपये वाचवू शकता.
तुमची जुनी गाडी स्क्रॅप करून तुम्हाला नवीन गाडीच्या किमतीच्या ४ ते ६ टक्के रक्कम मिळते. याचा अर्थ असा की जर तुम्ही १० लाख रुपयांची कार खरेदी केली असेल, तर तुम्हाला ६०,००० रुपयांचे स्क्रॅपिंग मूल्य मिळू शकते.