टीम इंडियाची इंग्लंडविरूद्धच्या पाचव्या सामन्यासाठी बीसीसीआयकडून घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयने संघाता परत एकदा फ्लॉप खेळाडूला जागा दिली आहे.
टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामधील पाचवा कसोटी सामना 7 मार्च ते 11 मार्चमध्ये होणार आहे. हा सामना धर्मशाला येथे होणार असून त्यासाठी बीसीसीआयने संघाची घोषणा केली आहे.
बीसीसीआयने जाहीर केलेल्या संघामध्ये स्टार खेळाडू के.एल. राहुल याचा समावेश नाही. त्यामुळे राहुल शेवटच्या सामन्यातही संघात नसणार आहे. राहुल नसल्यामुळे संघात एका खेळाडूला लॉटरी लागली आहे.
के. एल. राहुल संघात नसल्यामुळे मालिकेत फ्लॉप ठरलेल्या रजत पाटीदार याची निवड करण्यात आली आहे. पाटीदार याची मागील सामन्यातील 32, 9, 5, 0, 17 आणि 0 अशी कामगिरी पाहायला मिळाली आहे. त्यामुळे त्याला शेवटच्या सामन्यामध्ये डच्चू देण्यात येणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र बीसीसीआयने त्याला संघात कायम ठेवलं आहे.
5व्या कसोटीसाठी भारताचा संघ: रोहित शर्मा (C), जसप्रीत बुमराह (VC), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (WK), केएस भरत (WK), देवदत्त पडिक्कल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.