भारताचा धडाकेबाज फलंदाज रिषभ पंतने अहमदाबाद येथे झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडविरुद्ध शतक ठोकले. त्याने 101 धावांची खेळी केली. पंतच्या खेळीमुळे भारताने पहिल्या डावात 89 धावांची आघाडी घेतली. दुसर्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने सात गडी गमावून 294 धावा केल्या. पंतने शतकी खेळीसह नेत्रदीपक कामगिरी केली.
रिषभ पंत पाठीमागच्या पाच कसोटी सामन्यात तीनदा शतक ठोकण्यापासून दूर राहिला. चौथ्या वेळेला त्याला यश मिळालं. पंतने ऑस्ट्रेलिया दौर्यात सिडनीमध्ये 97 आणि ब्रिस्बेनमध्ये नाबाद 89 धावा केल्या होत्या. त्यानंतर चेन्नईत झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याने 91 धावांची खेळी केली. खूप काळ शतकापासून दूर राहिल्यनंतर आता त्याने शेवटी अहमदाबादमध्ये शतक झळकावलं.
अॅडम गिलख्रिस्टनंतर रिषभ हा दूसरा खेळाडू आहे ज्याने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि भारतात शतक झळकवण्याचा पराक्रम केलाय. या दोघांव्यतिरिक्त कोणत्याही फलंदाजाने या तीन देशांत कसोटी शतक झळकावले नाही.
अँडरसन सामन्यातील 83 वी ओव्हर टाकयला आला. पंत आणि वॉशिग्टंन सुंदरमध्ये सातव्या विकेटसाठी 99 धावांची भागीदारी झाली होती. तर पंत स्वत: 89 धावांवर खेळत होता. अँडरसनने या ओव्हरमधील पहिल्या चेंडूवर पंतने परफेक्ट टायमिंगसह फर्स्ट स्लीपच्या डोक्यावरुन अचूक रिव्हर्स स्वीप लगावला.
रिषभने इंग्लंडचा कर्णधार जो रुटच्या बोलिंगवर सिक्स खेचत शतक पूर्ण केलं.