इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या टी 20 सीरीजसाठी भारतीय संघाची (India vs England) घोषणा करण्यात आली आहे. टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुरा ही विराट कोहलीकडे असणार आहे. या सीरीजसाठी IPL मध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या सुर्यकुमार यादव, राहुल तेवतिया आणि इशान किशन या तिघांना संधी देण्यात आली आहे. सूर्यकुमारने आयपीएलच्या 13 व्या मोसमात धमाकेदार कामगिरी केली होती. तसेच देशांतर्गत स्पर्धांमध्ये उल्लेखनीय खेळीही केली होती. त्यामुळे त्याला ही संधी देण्यात आली आहे.
गत आयपीएल स्पर्धेमध्ये सर्वाधिक चौकार लगावण्याचा विक्रम राजस्थानच्या युवा फलंजादाने केला. त्याचं नाव राहुल तेवतिया... किंग्ज इलेव्हन पंजाब विर्ध खेळताना त्याने अविस्मरणीय इनिंग खेळली. तसंच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने चांगले रन्स केले.
इशान किशन संघात जागा मिळवण्यासाठी हकदार होता फक्त योग्य वेळेची वाट होती. 22 वर्षीय विकेटकीपर इशान किशनने मुंबई इंडियन्ससाठी काही धमाकेदार इनिंग खेळून आपल्या ंघाला विजय मिळवून दिला आहे. इंग्लंडविरुद्ध संघात निवड होण्यापूर्वीच्या काही तास अगदोर त्याने 94 बॉलमध्ये 173 रन्स ठोकले.
विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसन याच्या करिअरवर देखील परिणाम झाला आहे. आयपीएलमध्ये चढ-उतारानंतर भारतीय संघात स्थान मिळाल्यानंतर त्या संधीचं सोनं करण्यात अपयशी ठरलेल्या संजू सॅमसनला इंग्लंडविरुद्धच्या टी 20 मालिकेत भारतीय संघात स्थान मिळालं नाही.
दुखापतीच्या कारणास्तव मनीष पांडेला भारतीय संघात स्थान मिळालं नाही. परंतु त्याच्यासाठी धोक्याची घंटा आहे कारण संघात जागा मिळूनही चांगलं प्रदर्शन करण्यात त्याला अपयश येतंय. सूर्यकुमार यादव आणि इशान किशनच्या एन्ट्रीने त्याची जागा सेफ राहिलेली नाहीय.
इंग्लंडविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी भारतीय संघात काही दिग्गज खेळाडूंना स्थान मिळालेलं नाहीय. यात पहिलं नाव आहे कुलदीप यादव... दोन वर्षांपूर्वी युजवेंद्रसोबत कुलदीप भारतीय फिरकीची धुरा सांभाळत होता परंतु आता तो संघाबाहेर गेला आहे. टेस्ट क्रिकेटमध्येही संघात स्थान मिळवण्यास त्याला संघर्ष करावा लागत आहे.