India vs Pakistan Playing XI : रोहितचं ठरलंय, पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात टीम इंडियाची प्लेइंग 11

| Updated on: Jun 08, 2024 | 4:53 PM

IND vs PAK, T20 World Cup 2024, Predicted Playing XI : टी-20 वर्ल्ड कपमधील भारत आणि पाकिस्तानमधील हाय व्होल्टेज लढतीला काही तासांचा अवधी बाकी आहे. या सामन्याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागलेलं असणार आहे. दोन्ही टीमचा एक-एक सामना झाला असून टीम इंडियाने आयर्लंडचा आठ विकेटने पराभव केला होता. तर पाकिस्तान संघाला पहिल्याच सामन्यात यूएसने चारीमुंड्या चीत केलं होतं. त्यामुळे पाकिस्तान संघ उद्याचा सामना जिंकण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरेल. पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये कोणत्या खेळाडूंना स्थान मिळू शकतं पाहा.

1 / 4
भारत आणि पाकिस्तानमधील सामना न्यूयॉर्कमध्ये 9 जूनला रात्री 8 वाजता सुरू होणार आहे. रोहित शर्मा अँड कंपनीसमोर पाकिस्तानच्या तिखट गोलंदाजांचं कडवं आव्हान असणार आहे.

2 / 4
टीम मॅनेजमेंट पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यामध्ये कोणाला संधी देते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. रोहित आणि विराट ओपनिंग करताना दिसतील. तर ऋषभ पंत पहिल्या सामन्याप्रमाणे तीन नंबरला खेळताना दिसेल.

3 / 4
भारत आणि पाकिस्तान टी-२० वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत सातवेळा आमने सामने आले आहेत. यामध्ये भारतीय संघाने आपलं वर्चस्व राखलं असून सहा सामन्यात विजय मिळवला आहे. तर फक्त एका सामन्यामध्ये पाकिस्तान संघाला विजय मिळवता आला आहे. पाकिस्तान संघाने टी-२० वर्ल्ड २०२१ मध्ये भारताचा १० विकेटने पराभव केला होता.

4 / 4
भारताची पाकिस्तानविरूद्ध संभाव्य प्लेइंग 11 :  रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह.