भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार, साल 2029 ला इतर देशांची काय असणार स्थिती?

| Updated on: Nov 06, 2024 | 2:13 PM

साल 2030 पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्थान बनणार आहे. साल 2029 मध्ये ही अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा आकार भारताच्या साडे पाच पट जास्त असेल. भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत असून येत्या काही वर्षांत चौथी आणि नंतर तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती भारत बनणार आहे. पाच वर्षांनंतर या दशकाच्या अखेर जगभरातील अर्थव्यवस्थांची स्थिती काय असेल? 2029 जगातल्या टॉप 10 अर्थव्यवस्था कोणत्या असतील ? टाका एक नजर ...

1 / 10
1- साल 2029 मध्ये देखील अमेरिकेची अर्थव्यवस्थेचा जगात दबदबा असेल अमेरिका साल 2029 मध्ये पहिल्या क्रमांकावरच असणार आहे. आयएमएफ या संस्थेच्या मते अमेरिकेचा जीडीपी सुमारे 35,458 अब्ज डॉलर रहाण्याची शक्यता आहे.

2 / 10
2. आयएमएफच्या अंदाजानुसार चीन साल 2029 मध्ये दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असेल, सध्या देखील चीनचा जगात अमेरिकेनंतर दुसरा क्रमांक आहे आयएमएफच्या अंदाजानुसार चीनचा जीडीपी 2029 मध्ये 24,590 अब्ज डॉलरच्या आसपास असेल. आता जीडीपी 18,273 अब्ज डॉलरच्या आसपास आहे.

3 / 10
3. आयएमएफच्या अंदाजानुसार साल 2029-30 मध्ये भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होईल.अलिकडच्या आकडेवारीनुसार भारत 2028 पर्यंत जगातील टॉप-10 अर्थव्यवस्थेपैकी भारत तिसऱ्या क्रमांकावर असेल.2029 मध्ये भारताचा जीडीपी 6,307 अब्ज डॉलर होण्याची शक्यता आहे. आता जीडीपीचा आकार 3,889 अब्ज डॉलरच्या जवळ आहे. आता भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था आहे.

4 / 10
4.सध्याच्या घडीला जर्मनीच्या अर्थव्यवस्था जगातील टॉप- 10 पैकी तिसऱ्या क्रमांकावर आहे, ऑक्टोबर 2024 आयएमएफच्या अहवालानुसार साल 2029 मध्ये जर्मनीच्या जीडीपीचा आकार 5,566 अब्ज डॉलरच्या जवळ असेल.

5 / 10
5.जपान साल 2029 पर्यंत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असेल असा आयएमएफचा अंदाज आहे. काही वर्षांनंतर भारत जपानला मागे टाकेल. आयएमएफच्या अंदाजाने साल 2029 मध्ये जपानचा जीडीपी 5,075 अब्ज डॉलर होईल. आता जपान जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे.

6 / 10
6.ग्रेट ब्रिटन म्हणजे युनायटेड किंगडम साल 2029 मध्ये टॉप - 10 अर्थव्यवस्तेत सहाव्या क्रमांकावर असेल. सध्या युके जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था आहे.आयएमएफच्या आकड्यांनुसार साल 2029 मध्ये युकेचा जीडीपी सुमारे 4,372 अब्ज डॉलर असेल.

7 / 10
7.फ्रान्स साल 2024 मध्ये जगातील सातवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे.साल 2029 मध्येही फ्रान्सची ही स्थिती कायम असेल. आयएमएफच्या मते सध्याची फ्रान्सची 3,174 अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था साल 2029 मध्ये 3,726 अब्ज डॉलरची होईल.

8 / 10
8.ब्राझीलच्या अर्थव्यवस्थेचा क्रमांक सध्या नववा आहे. ब्राझील फ्रान्सला मागे टाकत येत्या काही वर्षांत आठव्या क्रमांकावर जाण्याची आशा आहे.साल 2029 मध्ये ब्राझील आपली पोझिशन कायम राखेल. आयएमएफच्या अलिकडच्या अहवालानुसार साल 2029 मध्ये ब्राझीलचा जीडीपीचा आकार वाढून 2,855 अब्ज डॉलर झाला असेल

9 / 10
9. सध्या कॅनडाच्या अर्थव्यवस्थेचा क्रमांक 10 वा आहे. साल 2029 मध्ये कॅनडा नवव्या क्रमांकावर येण्याची शक्यता आहे. आयएमएफच्या मते साल 2029 पर्यंत कॅनडाची अर्थव्यवस्थेचा आकार वाढून 2,794 अब्ज डॉलर होण्याची शक्यता आहे.

10 / 10
10.जगाच्या दहा प्रमुख अर्थव्यवस्थेत इटलीचा आठवा क्रमांक लागतो. परंतू आयएमएफच्या अंदाजानुसार यात घसरण होऊन साल 2029 मध्ये इटली दहाव्या क्रमांकावर जाईल. आयएमएफच्या नुसार साल 2029 मध्ये इटलीच्या जीडीपीचा आकार सुमारे 2,736 बिलियन डॉलर असेल.