लग्नाच्या गाठी या स्वर्गातच जुळलेल्या असतात असं म्हणतात. ते खरंही आहे. तुम्ही कुठे जन्माला आलात याला काहीही महत्त्व नसतं. कारण तुमचा जोडीदार तुमच्या परिसरातीलच असेल असं नाही. अनेकांची आंतरजातीय विवाह होतात तर काहींच्या रेशीमगाठी परदेशी व्यक्तिंबरोबर जुळतात. बॉलिवूडचे कलाकारही याला अपवाद नाहीत. सातासमुद्रापार जीवनसाथी शोधलेल्या काही बॉलिवूड कलाकारांवर टाकलेली ही नजर...
तापसी पन्नू - मॅथियस बो : गेल्या काही दिवसांपासून इन्स्टाग्रामवर तापसीच्या रिलेशनशिपबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. हे सगळं सुरु झालं ते म्हणजे तापसीनं मालदीवच्या ट्रीपमध्ये एक व्हिडिओ शेअर केल्यानं. या व्हिडिओनंतर तापसी आणि मॅथियस बो हे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. मॅथियस हा कॅनडाचा बॅडनमिंटनपटू आहे. मात्र तापसी आणि मॅथियस प्रमाणेच असे अनेक कलाकार आहेत ज्यांची नाती विदेशात जोडली गेली आहेत.
प्रियंका चोपरा -निक जोनस : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंकानं 2018मध्ये अमेरिकन संगीतकार, गीतकार निक जोनससोबत धूमधडाक्यात लग्न केलं. या दोघांच्या नात्याची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली. कारण प्रियंका निकहून 10 वर्षांनी मोठी आहे.
राधिका आपटे- बेनेडिक्ट टेलर : बेनेडिक्ट टेलर हा एक लोकप्रिय ब्रिटीश संगीतकार आहे. राधिकानं 2013 मध्ये बेनेडिक्ट टेलरशी लग्न केलं होतं. हे दोघे सध्या लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये आहेत.
प्रीती झिंटा- जीन गुडएनफ : प्रीती झिंटानं 2016मध्ये अमेरिकेत राहणाऱ्या जीन गुडएनफशी लग्नगाठ बांधली. अमेरिकेत या दोघांनी हिंदू पद्धतीनं विवाह केला होता. जीन हा लॉसएंजेलिसमध्ये असतो.
नीना गुप्ता- व्हिव्हियन रिचर्ड्स : नीना गुप्ता आणि वेस्टइंडिजचा पूर्व क्रिकेटपटू व्हिव्हियन रिचर्ड्स हे दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. 1989 मध्ये नीना गुप्ताने मसाबाला जन्म दिला. काही वर्षांनंतर ते दोघं विभक्त झाले. नंतर नीना गुप्ता यांनी मसाबाला सांभाळलं.