PHOTO: भारतीय वायूदलाची शान अन् शत्रूचा कर्दनकाळ
भारतीय वायूदलात 1,40,000 कर्मचारी असून IAF कडे 1,820 लढाऊ विमाने आहेत. यामध्ये जगातील अत्याधुनिक विमानांचा समावेश आहे. | IAF combat aircrafts
-
-
-
जॅग्वार विमान हे 1,350 किलोमीटर वेगाने उडू शकते. लक्ष्याचा अचूक भेद घेणाऱ्या जगातील मोजक्या लढाऊ विमानांमध्ये जॅग्वारचा समावेश होतो.
-
-
मिग 21 हे भारतीय वायूदलातील सर्वात जुन्या विमानांपैकी एक आहे. रशियन बनावटीच्या या विमानाने अनेक युद्धांमध्ये पराक्रम गाजवला आहे. या विमानाचा वेग प्रतितास 2,230 किमी इतका आहे.
-
-
मिग 29 हे रशियन बनावटीचे विमान प्रतितास 2245 किलोमीटर या वेगाने उडू शकते. या विमानात 30 एमएम, आर 60 क्लोज कॉम्बॅट आणि आर 27 आर मीडियम रेंज मिसाईल अशा आयुधांचा समावेश आहे.
-
-
मिराज 2000 हे सिंगल सीटर आणि मल्टी डिफेन्स प्रकारातील लढाऊ विमान आहे. या विमानाचा वेग प्रतितास 2,495 किमी इतका आहे.
-
-
सुखोई 30 एमकेआय हे भारतीय वायूदलाच्या ताफ्यातील आणखी एक अत्याधुनिक विमान आहे. 8000 किलो युद्धसामुग्री घेऊन हे विमान उड्डाण करु शकते. या विमानात एअर टू एअर मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि क्लोझ रेंज क्षेपणास्त्रांचा समावेश आहे.
-
-
राफेल हे सध्याच्या घडीला भारतीय वायूदलाती असणारे सर्वाधिक अत्याधुनिक विमान आहे. फ्रेंच बनावटीच्या या विमानाची मारक क्षमता प्रचंड आहे. लेझर गाईडेड बॉम्ब आणि क्षेपणास्त्रांनी हे विमान सुसज्ज आहे.