Indian Billionaire : स्वातंत्र्यावेळी ही कुटुंब होती श्रीमंत! आजही संपत्तीत जलवा

| Updated on: Aug 15, 2023 | 6:09 PM

Indian Billionaire : स्वातंत्र्य चळवळीत झोपडीतील माणसापासून ते राजमहलातील श्रीमंतापर्यंत अनेकांनी हिरारीने भाग घेतला. स्वातंत्र्य काळात अनेक कुटुंब श्रीमंत होती. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत उडी घेतली. अनेकांना त्यांनी मदत केली. आजही या कुटुंबाकडे कोट्यवधींची संपत्ती आहे.

Indian Billionaire : स्वातंत्र्यावेळी ही कुटुंब होती श्रीमंत! आजही संपत्तीत जलवा
Follow us on

देशातील स्वातंत्र्य चळवळीत टाटा, बिर्ला, बजाज, महिंद्रा अशी अनेक श्रीमंत कुटुबांनी हिरारीने सहभाग घेतला. त्यावेळी ही कुटुंब श्रीमंत होती. त्यांचे उद्योग भरभराटीला होते. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत मोठे योगदान दिले. त्यांनी पण हालअपेष्टा सहन केल्या. त्यांच्या काही वास्तू चळवळीसाठी दिल्या. अनेकांना मदतीचा हात दिला. आज पण या कुटुंबाकडे अफाट संपत्ती आहे. त्यांचे उद्योग भरभराटीला आले आहेत. त्यांची आताची पिढी अब्जाधीश आहे. त्यांनी हजारो हातांना रोजगार दिला आहे.

हे सुद्धा वाचा

भारत आज स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहे. स्वातंत्र्याचा 76 वर्षोंचा कालावधी उलटून गेला आहे. स्वातंत्र्यासाठी अनेकांना प्राणाची आहुती दिली. अनेकांनी हालअपेष्टा सहन केल्या. काहींनी आर्थिक योगदान दिले. त्यावेळी काही श्रीमंतांनी, श्रीमंती नाकारुन भरड कपडे घातले. त्यांचे उद्योग बहरले. आजही त्यांच्या पिढीचा जलवा कायम आहे.

भारत 1947 मध्ये स्वतंत्र झाला. त्यावेळी देशातील अब्जाधीशांमध्ये टाटा, बिर्ला, बजाज, महिंद्रा यांचे नाव आहे. हैदराबादचा निजाम मात्र त्यांच्यापेक्षा श्रीमंत होता. त्याच्याकडे अफाट माया होती. तो प्रचंड श्रीमंत होता.

हैदराबादचा निजाम मीर उस्मान अली खान भारताचा पहिला मोठा अब्जाधीश होता. निजामाकडे एकू्ण 230 दशलक्ष डॉलर म्हणजे 17.47 लाख कोटी रुपयांची संपत्ती होती. आजही इंग्लंडमधील एका बँकेत निजामाची 3 अब्जहून अधिक रक्कम आहे.

आज प्रत्येक भारतीयाला बजाज समूहाची माहिती आहे. जमनालाल बजाज यांनी त्याची सुरुवात केली. 1920 च्या कालावधीत त्यांनी बजाज समूहाची स्थापना केली. आज समूहाकडे 25 हून अधिक कंपन्या आहेत. या समूहाची वार्षिक उलाढाल 280 अब्ज रुपयांहून अधिक आहे. त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली होती.

मीठापासून ते ट्रक तयार करणाऱ्या टाटा समूहाचा इतिहास 100 वर्षांपेक्षा अधिक आहे. भारताच्या स्वातंत्र्यावेळी जेआरडी टाटा हे प्रमुख होते. जुलै 1988 मध्ये त्यांनी अध्यक्ष पद सोडले. आतापर्यंत या समूहातंर्गत 95 उद्योग आहेत. आता या समूहातील कंपन्यांचे एकूण बाजारातील भांडवल 311 अब्ज अमेरिकीन डॉलर आहे.

देशातील ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये महिंद्रा ग्रुपने आघाडी घेतली आहे. भारताच्या स्वातंत्र्यावेळी कैलाश चंद्र महिंद्रा आणि जगदीश चंद्र महिंद्रा यांच्या हातात समूहाची कमान होती. त्यावेळी त्यांची गणना अब्जाधीशामध्ये होत होती. आज महिंद्रा समूहाकडे 1.85 खरब रुपयांची संपत्ती आहे.

बिर्ला समूहाचे संस्थापक घनशामदास बिर्ला हे मोठे उद्योजक होते. आज बिर्ला ग्रुपकडे जवळपास 195 अब्ज रुपयांपेक्षा अधिकची संपत्ती आहे.