मन तेवढं मोठं लागतं! टीम इंडियाच्या ‘या’ स्टार खेळाडूचा मोठा निर्णय, संपत्ती करणार दान

| Updated on: Jun 15, 2024 | 8:49 PM

टीम इंडियाचा धाकड खेळाडू रिषभ पंत याने मोठा निर्णय घेतला आहे. टी-२० वर्ल्ड कप 2024 सुरू असताना पंतने आपली संपत्ती दान करणार असल्याचं वक्तव्य केलं आहे. रिषभ पंतने असा निर्णय का आणि कशासाठी घेतला जाणून घ्या.

1 / 5
क्रिकेट जगतात वर्ल्ड कप सुरू असून साखळी सामने संपले संपण्यासाठी अवघे तीन दिवस बाकी राहिले आहेत. तर सुपर8 मधील भारतीय संघाने आपली जागा पक्की केली आहे. साखळी सामन्यांमध्ये भारतीय संघ व्यवस्थापनाने एक बदल केला. पंतला तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी त्याला पाठवलं जात आहे.

2 / 5
रिषभ पंतनेही आपल्यावर दाखवलेल्या विश्वास सार्थ ठरवत जिगरबाज खेळ करत आहे. मोठ्या अपघातून परतलेला पंत आक्रमक अंदाजात खेळत आहे. पाकिस्तानविरूद्ध्या सामन्यात त्याने ४३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. पंत आता वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.

3 / 5
 पंतने 18 मे 2024 रोजी त्यांचे यूट्यूब चॅनल सुरू केलं होतं. यावर त्याने आतापर्यंत सात व्हिडिओ अपलोड केले आहेत. पंतच्या चॅनेलचे एक लाख सबस्क्राइबर्स पूर्ण झाले. पंतने You Tube वर कम्युनिटीवर पोस्ट करत सिलवर बटन आल्याची माहिती देत एक घोषणा दिली.

4 / 5
हे सिल्व्हर प्ले बटण आपल्या सर्वांचे आहे. मी माझ्या स्वतःच्या कमाईतील काही योगदानासह सर्व YouTube कमाई दान करण्याचं वचन देत आहे, असं पंत म्हणाला.

5 / 5
बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यात त्याने 53 धावांची इनिंग खेळली होती. त्यानंतर त्याने T20 विश्वचषकात आयर्लंडविरुद्ध नाबाद 36 धावा, पाकिस्तानविरुद्ध 42 धावांची आणि नंतर अमेरिकेविरुद्ध 18 धावांची खेळी केली.