Indian Railway : तुम्हाला ट्रेनमध्ये लोअर बर्थ हवा आहे का? जाणून घ्या काय आहे नियम

| Updated on: Apr 17, 2023 | 11:47 PM

भारतीय रेल्वेने लोअर बर्थबाबत नियम केले आहेत. लोअर बर्थ आरक्षित करण्यासाठी काय करावे आणि रेल्वे कशी वाटप करते, जाणून घ्या

1 / 6
भारतीय रेल्वे जगातील चौथ्या क्रमांकाचं नेटवर्क आहे. दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी रेल्वे वेळोवेळी नियम बदलत असते. तसेच अधिक सुविधा उपलब्ध करून देते.

2 / 6
लोअर बर्थसाठी अशाच काही तरतुदी  करण्यात आल्या आहेत. जर तुम्ही ट्रेनने प्रवास करत असाल आणि लोअर बर्थ घ्यायचा असेल. बुकिंग करण्यापूर्वी तुम्हाला हे नियम माहित असणं गरजेच आहे.

3 / 6
भारतीय रेल्वेनुसार खालचा बर्थ काही लोकांसाठी आरक्षित आहे. त्यांना ही जागा आधी दिली जाते. त्यानंतर तो इतरांना दिला जातो.

4 / 6
लोअर बर्थ प्रथम दिव्यांगांना दिला जाईल, असा रेल्वेचा नियम आहे. यानंतर ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना प्राधान्य दिलं जातं. त्यानंतर इतरांना वाटप केलं जातं.

5 / 6
रेल्वे बोर्डाच्या निर्देशानुसार स्लीपर क्लासमध्ये चार आणि एसीमध्ये दोन जागा दिव्यांगांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. गरीब रथ ट्रेनमध्ये अपंगांसाठी दोन जागा राखीव आहेत. तर ज्येष्ठ नागरिकांना न विचारता बर्थ दिले जात आहेत.

6 / 6
गर्भवती महिला असेल तर तिलाही लोअर बर्थ दिला जाईल. तुम्ही IRCTC वेबसाइटवर जाऊन तिकीट बुक करू शकता.