स्वस्तात फिरण्याचा आनंद लुटता येणार! या देशात आपल्या रुपयाची किंमत कित्येक पटीने वाढते

| Updated on: Sep 09, 2023 | 11:27 PM

तुम्ही विदेशात फिरण्याचा प्लान आखत आहात का? तर तुम्ही हे देश तुमच्या बकेट लिस्टमध्ये सहभागी करू शकता. या देशांमध्ये भारतीय रुपयाची किंमत कित्येक पटीने वाढते. त्यामुळे खर्च करण्याचं टेन्शन दूर होतं.

1 / 5
तुम्हाला विदेशात फिरण्याची इच्छा असेल. पण तुमचं बजेट कमी असेल तर तुम्ही या देशात आरामात फिरू शकता. यासाठी तुम्हाला खूप पैशांची गरज नाही. चला जाणून घेऊयात या यादीत कोणते देश आहेत ते..

2 / 5
इंडोनेशिया हा देश भारतीय पर्यटकांसाठी परफेक्ट डेस्टिनेशन आहे. या ठिकाणी बाली, जकार्ता, उबड, बाटम, बोरोबुदुर मंदिर आणि नुसा लेंबोंगन सारखी ठिकाणं आहेत. भारताचा एक रुपयाची किंमत 184.12 इंडोनेशियाई रुपया आहे.

3 / 5
वियतनामही पर्यटनासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे. या देशातील घनदाट जंगल आणि डोंगरदऱ्यांचा आनंद लुटू शकता. हालोंग बे, हनोई, हा गियांग आणि सापा सारखी आकर्षक ठिकाणं आहेत. वियतनाममध्ये भारताच्या एक रुपयाची किंमत 289.54 वियतनामी डोंग इतकी आहे.

4 / 5
कंबोडिया फिरण्यासाठी उत्तम पर्यटन स्थळ आहे. या देशात फिरण्याचा प्लान आखू शकता. अंगकोर वाट टेम्पल आणि कोह रोंगसारखं लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. भारताच्या एका रुपयाची किंमत 50.05 कंबोडियाी रियाल आहे.

5 / 5
श्रीलंका फिरण्यासाठी चांगलं ठिकाण आहे. हा देश चारही बाजूने समुद्राने वेढलेला आहे. या ठिकाणी तुम्ही ट्रेकिंगचा आनंद लुटू शकता. नाइन आर्च ब्रिज, मिनटेल, गल विहार आणि रावण वॉटरफॉल फिरण्यासाठी उत्तम ठिकाणं आहेत. भारताच्या एका रुपयाची किंमत 3.89 श्रीलंकन रुपया इतका आहे.