Marathi News Photo gallery India's First Air Train at Delhi International Airport, 2,000 crores cost for automated People Movers, but travel for free, where to run, which stop
भारतातील पहिली Air Train; 2,000 कोटींचा खर्च, पण प्रवास करा फुकट, धावणार कुठे, स्टॉप तरी कोणते
First Air Train : भारतात लवकरच एअर ट्रेन धावणार आहे. त्यासाठी जवळपास 2000 कोटी रुपयांचा खर्च येण्याचा अंदाज आहे. पण यात्रेकरूना या प्रवासासाठी छदाम सुद्धा द्यावा लागणार नाही. प्रवाशी मोफत एअर ट्रेनचा प्रवास करु शकतील. कुठे सुरू होणार ही सेवा?
1 / 6
देशात रेल्वेचे मजबूत जाळे विणलेले आहे. दररोज जवळपास दोन ते अडीच कोटी प्रवासी ट्रेनने प्रवास करतात. लाखो रुळांवरून देशभरात ट्रेन धावतात. सुपरफास्ट, एक्सप्रेस, मेल, पॅसेंजर अशा ट्रेन देशभरात जातात.
2 / 6
पण प्रवाशांसाठी आता हवाई ट्रेन (Air Train) धावणार आहे. ही रेल्वे अत्यंत खास आणि आकर्षक असेल. ही देशातील पहिली आणि एकमेव ट्रेन आहे. ही ट्रेन हवेशी गप्पा मारेल. प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाईल.
3 / 6
ही ट्रेन स्वयंचलित असेल. दिल्ली विमानतळावर कनेक्टिव्हिटी अजून प्रभावी करण्यासाठी तिचा वापर करण्यात येणार आहे. दिल्ली आतंरराष्ट्रीय विमानतळावर या एअर ट्रेनसाठी वेगवेगळे टर्मिनल उभारण्यात येतील. IGI एअरपोर्टच्या आता सर्व टर्मिनल या एअर ट्रेनला जोडलेले असतील. विमानतळावरील 1, 2 आणि 3 टर्मिनलच्या दरम्यान 7.5 किलोमीटरचा हा मार्ग असेल.
4 / 6
दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने (DIAL) टर्मिनलच्या दरम्यान ऑटोमेटेड पीपल मु्व्हर म्हणजे एअर ट्रेनसाठीची तयारी केली आहे. हा प्रकल्प येत्या तीन वर्षांत, 2027 च्या अखेरीस पूर्ण होण्याची शक्यता आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठीचा अंदाजित खर्च 2000 कोटी रुपये इतका आहे.
5 / 6
ही एअर ट्रेनची T1, T2/3, एअरोसिटी आणि कार्गो सिटी येथे थांबे असतील. विशेष म्हणजे या ट्रेनसाठी प्रवाशांना एक छदाम पण खर्च करावा लागणार नाही. सध्या दिल्ली विमानतळावरून वर्षाला 7 कोटींहून अधिक प्रवाशी उड्डाण करतात. येत्या काही वर्षांत ही संख्या दुप्पट होणार आहे. त्यामुळे टर्मिनल्सदरम्यान कनेक्टिव्हिटीसाठी एअर ट्रेन महत्वाची असेल.
6 / 6
एअर ट्रेन सुरू झाल्यानंतर लोकांच्या वेळेत मोठी बचत होईल. सध्या प्रवाशी एका टर्मिनलवरुन दुसऱ्या टर्मिनलवर जाण्यासाठी डीटीसी या शटल बसचा वापर करतात. एअर ट्रेन सुरू झाल्यानंतर प्रवाशांच्या वेळेत मोठी बचत होईल.