Photos | ‘मी काहीही पोस्ट करु शकते, CEO शी माझं अफेअर’, अमेरिकेच्या पॉर्नस्टारचं इंस्टाग्राम अकाऊंट बॅन
अमेरिकेची पॉर्नस्टार केंड्रा संडरलँडने (Kendra Sunderland) आपल्या 22 लाख फॉलोवर्स असलेल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर केलेल्या दाव्याने एकच खळबळ माजली.
-
-
अमेरिकेची पॉर्नस्टार केंड्रा संडरलँडने (Kendra Sunderland) आपल्या 22 लाख फॉलोवर्स असलेल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर केलेल्या दाव्याने एकच खळबळ माजली.
-
-
तिने आपलं इंस्टाग्रामच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याशी (CEO) अफेअर असल्याचं सांगत त्यामुळेच मला काहीही पोस्ट करता येतं, असा दावा केला होता. यानंतर इंस्टाग्रामने तिचं अकाऊंड बॅन केलं आहे (Instagram banned Kendra Sunderland).
-
-
संडरलँडने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं, “मी कोणतीही पोस्ट करु शकते. इंस्टाग्रामच्या नियमात न बसणारीही पोस्ट करु शकते. माझं इंस्टाग्रामच्या सीईओ एडम मोसैरीसोबत अफेअर आहे त्यामुळेच मला हा विशेषाधिकार आहे.”
-
-
25 वर्षीय संडरलँडने इंस्टाग्रामवर स्वतःचा एक टॉपलेस फोटो पोस्ट केला होता. तो इंस्टाग्रामवर अनेक आठवडे दिसत होता. यानंतर संडरलँडने एक पोस्ट करत म्हटलं की ‘हेलो मित्रांनो! माझं अकाऊंट अजूनही डिलीट करण्यात आलेलं नाही.’
-
-
संडरलँडचं अकाऊंट ब्लॉक केल्यानंतर इंस्टाग्रामकडून हे सर्व आरोप फेटाळण्यात आले. तसेच पॉर्नस्टार संडरलँडचा मोसैरी किंवा इंस्टाग्रामच्या कोणत्याही कर्मचाऱ्याशी काहीही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण दिलं.
-
-
यानंतर एका मुलाखतीत बोलताना पॉर्नस्टार संडरलँड हिने ही पोस्ट केली तेव्हा नशेत असल्याचं सांगितलं.
-
-
न्यूयॉर्क पोस्टमधील वृत्तानुसार संडरलँड म्हणाली, ‘इतक्या छोट्याशा गोष्टीसाठी अकाऊंट बॅन केल्याने मला आश्चर्य वाटलं. खरंतर मला इंस्टाग्रामचे सीईओ कोण आहेत हेही माहिती नाही. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात अशा कोणत्याही व्यक्तीला भेटले देखील नाही.’