Photos : International Womens Day : जगाला बदलवणाऱ्या महिला, तुम्हाला यापैकी कुणी प्रेरित केलंय?
जागतिक महिला दिनानिमित्त (International Womens Day) जगाला बदलवणाऱ्या महिलांचा हा खास आढावा. तुम्हाला यापैकी कुणी प्रेरित केलंय?
-
-
इस्थर डफ्लो (Esther Duflo) यांना 2019 मध्ये अर्थशास्त्रातील कामगिरीसाठी नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यांनी जागतिक पातळीवरुन गरिबी निर्मुलनासाठी जे संशोधन कार्य केलं त्याची दखल घेत डफ्लो यांना हा पुरस्कार देण्यात आला. त्यांचा जन्म 25 ऑक्टोबर 1972 रोजी फ्रान्समध्ये झाला होता.
-
-
मलाला युसुफझाईला (Malala Yousafzai) शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार मिळालाय. मलालाला तिच्या प्रतिकुल परिस्थितीत मुलांच्या शिक्षणासाठी लढण्याच्या संघर्षासाठी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मलालाचा जन्म 12 जुलै 1997 रोजी झाला.
-
-
इम्यॅनुले चारपेंटीयर (Emmanuelle Charpentier) यांना 2020 मध्ये केमिस्ट्रीमध्ये नोबेल पुरस्कार मिळाला. त्यांना जिनोम एडिटिंगची विकसित केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. त्यांचा जन्म 11 डिसेंबर 1968 रोजी फ्रान्समध्ये झाला होता.
-
-
ओल्गा टोकरझुक (Olga Tokarczuk) यांना 2018 मध्ये साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला. त्यांचा जन्म 29 जानेवारी 1962 रोजी पोलंडमध्ये राहिल्या.
-
-
तु युयु (Tu Youyou) यांना 2015 मध्ये वैद्यकीय क्षेत्रातील कामागिरीसाठी नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी संशोधित केलेल्या मलेरियावरील उपचाराच्या पद्धतीसाठी त्यांना नोबेल पुरस्कार मिळालाय. त्यांचा जन्म 30 डिसेंबर 1930 रोजी चीनमध्ये झाला होता.
-
-
महिलांच्या सुरक्षेसाठी अहिंसक पद्धतीने लढा देणे आणि महिलांचा जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी सहभाग घेणे या कामासाठी लेमाह (Leymah Gbowee) यांना 2011 मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला. त्यांचा जन्म 1 फेब्रुवारी 1972 रोजी लिबेरियात झाला.