मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सवर 57 धावांनी मात केली. मुंबईने 5 वर्षांनंतर राजस्थानला पराभूत केलं. या सामन्यात मुंबईच्या खेळाडूंनी चांगली फिल्डिंग केली.
मुंबईने राजस्थानला विजयासाठी 194 धावांचे आव्हान दिले होते. विजयी आव्हानाचं पाठलाग करताना राजस्थानची खराब सुरुवात झाली. पण जॉस बटलरने राजस्थनाचा डाव सावरला. बटलरने फटकेबाजी सुरु केली.
बटलरने सामन्याच्या 13 व्या ओव्हरमध्ये जेम्स पॅटिन्सनच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारला. सीमारेषेवर उभ्या असलेल्या किरन पोलार्डने भन्नाट झेल घेतला. बटलरची ही विकेट मॅचचा टर्निंगपॉईंट ठरला. पोलार्डने आधी एकहाती झेल घेतली. मात्र चेंडू हातातून सटकला. त्याने स्वत:ला सावरलं. पुन्हा प्रयत्न करत झेल दोन्ही हाताने घेतली.
पोलार्ड नेहमीच सीमारेषवर अशा भन्नाट झेल घेतो.
अनुकूल रॉयने महिपाल लोमरुरची उलट पळत हवेत झेप घेत झेल घेतली. सामन्याच्या ८ व्या षटकात राहुल चहरच्या गोलंदाजीवर हा सर्व प्रकार घडला. अनुकूल रॉय सूर्यकुमार यादवच्या जागी बदली खेळाडू म्हणून आला होता. बॅटिंगदरम्यान डोक्याला झालेल्या दुखापतीमुळे सूर्यकुमारला फिल्डिंगसाठी मैदानात उतरता आले नाही. (सर्व फोटो : Mumbai Indians Facebook)