Marathi News Photo gallery Ipl 2020 mi vs dc final better as a captain than virat kohli give rohit the responsibility of t 20 leadership said gautam gambhir
PHOTO | विराटच्या तुलनेत कर्णधार म्हणून सर्वोत्तम, रोहितला टी 20 च्या नेतृत्वाची जबाबदारी द्या : गौतम गंभीर
रोहित शर्मा आयपीएलमधील यशस्वी खेळाडू आणि कर्णधार आहे.
1 / 5
माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या आयपीएलमधील नेतृत्वाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यानंतर गंभीरने कर्णधारपदाबाबत नवा पर्यायही समोर ठेवला आहे. "रोहित शर्माला पूर्णवेळ कर्णधार म्हणून जबाबदारी देण्यात यावी. जर दिली नाही, तर ते लज्जास्पद असेलच आणि क्रिकेटचंही दुर्दैव असेल", अशी भावना गंभीरने व्यक्त केली.
2 / 5
आयपीएलच्या अंतिम सामन्यात मुंबईने दिल्लीवर 5 विकेट्सने मात केली. यासह पाचव्यांदा विजतेपद पटकावलं. यावेळेस गंभीर ‘ईएसपीएन क्रिकइन्फो’ टी 20 टाईम आऊटमध्ये बोलत होता. कर्णधार रोहितने या अंतिम सामन्यात 51 चेंडूत 5 फोर आणि 4 सिक्ससह 68 धावांची विजयी खेळी केली.
3 / 5
“जर रोहित शर्मा भारताचा कर्णधार झाला नाही, तर ते रोहितचं नाही, तर ते टीम इंडियासाठी नुकसानाचं असेल. एक कर्णधार त्याच्या संघाइतकाच चांगला असावा लागतो, याच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे. परंतु कोण चांगला कर्णधार आणि कोण चांगला नाही, याबद्दल न्यायनिवाडा करण्यासाठी कोणते निकष आहेत? पॅरामीटर्स आणि बेंचमार्क समान असले पाहिजेत. रोहितच्या नेतृत्वात त्याच्या संघाने पाच आयपीएल विजेतेपदं पटकावली आहेत”असं गंभीर म्हणाला.
4 / 5
5 / 5
"कोहली हा वाईट कर्णधार आहे, असं मी म्हणणार नाही. पण दोघांनाही समान संधी मिळावी. जेणेकरुन दोघांची तुलना करताना एकच निकष लावता येईल", असं गंभीर म्हणाला होता.