IPL 2023 : आयपीएलचा 16 वा सिझन या खेळाडूंसाठी शेवटचा ? कोण कोण निवृत्त होऊ शकतं, जाणून घ्या

| Updated on: Mar 30, 2023 | 6:09 PM

आयपीएल 2023 स्पर्धा सुरु होणार असून काही खेळाडू पहिल्यांदाच खेळणार आहेत. तर काही खेळाडूंसाठी ही आयपीएल स्पर्धा शेवटची ठरू शकते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आयपीएलमध्ये काही खेळाडू खेळत आहेत.

1 / 5
महेंद्रसिंह धोनीसाठी ही शेवटची आयपीएल स्पर्धा ठरू शकते. पण याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा नाही. महेंद्रसिंह धोनी 41 वर्षांचा असला तरी एकदम फीट आहे. त्याच्या नेतृत्वात चेन्नईने 2010, 2011, 2018 आणि 2021 साली जेतेपद जिंकलं आहे. (PHOTO- IPL)

2 / 5
एमएस धोनी व्यतिरिक्त चेन्नई सुपरकिंग्सच्या 38 वर्षीय फलंदाज अंबाती रायडूचीही ही शेवटची आयपीएल स्पर्धा ठरू शकते. मागच्या पर्वात अंबाती रायडूने 13 सामन्यात 24 च्या सरासरीने 274 धावा केल्या आहेत. (PHOTO- IPL)

3 / 5
लखनऊ सुपरजायन्ट्ससाठी खेळणारा फिरकीपटू अमित मिश्राही निवृत्ती घेऊ शकतो. 40 वर्षीय अमित मिश्राने आयपीएलमध्ये हॅटट्रीक घेतली आहे. अमित मिश्राने 23.97 च्या सरासरीने 154 डावात 166 गडी बाद केले आहे. लखनऊ सुपर जायन्ट्स त्याला 2023 मध्ये 50 लाख रुपये देत संघात घेतलं आहे. (PHOTO - INSTAGRAM)

4 / 5
दिनेश कार्तिक आयपीएलची शेवटची स्पर्धा खेळेल असं बोललं जातंय. 38 वर्षीय दिनेश कार्तिकने 229 आयपीएल डावात 4376 धावा केल्या आहेत. दिनेश कार्तिकने कोलकाता नाईट राईडर्स कर्णधारपदही भूषवलं आहे. (PHOTO- IPL)

5 / 5
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फाफ डु प्लेसीस याचाही शेवटचा आयपीएल हंगाम ठरू शकतो. फाफ चेन्नई सुपरकिंग्स, रायझिंग पुणे सुपरजायन्ट्समध्ये खेळला आहे. फाफने 116 सामन्यात 34.37 च्या सरासरीने 3403 धावा केल्या आहेत. (PHOTO- IPL)