Marathi News Photo gallery IPL 2023 ben stokes jifra archer sam curran this players sold in crores rupees but flops in season latest marathi sport news
IPL 2023 : लिलावात करोडोंची बोली लावलेल्या या खेळाडूंनी लावला फक्त चुना, पाहा कोण आहेत?
IPL 2023 flops Players : सर्वाधिक बोली लागलेल्या खेळाडूंपेक्षा लाखोंची बोली लागलेल्या खेळाडूंनी चमकदार प्रदर्शन केलेलं पाहायला मिळालं आहे. मात्र कोटी खर्च केलेल्या संघांनी त्या खेळाडूंनी चुना लावला म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
1 / 5
आयपीएलच्या 16व्या हंगामात बेन स्टोक्स चेन्नई सुपर किंग्जमध्ये सहभागी झाला होता. संघाने त्याला 16.25 कोटींना खरेदी केले. पहिल्या काही सामन्यांमध्ये तो प्लेइंग इलेव्हनचा भाग होता पण त्यानंतर दुखापतीमुळे तो शेवटच्या 11 मधून बाहेर राहिला. या मोसमात तो सीएसकेसाठी केवळ दोन सामन्यांमध्ये दिसला. टी-20 वर्ल्ड कपमध्ये त्याने दमदार कामगिरी केली होती.
2 / 5
इंग्लंडचा युवा अष्टपैलू खेळाडू सॅम करणवर पंजाब किंग्ज संघाने 18.50 कोटींची बोली लावली होती. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. मात्र, तो संघाच्या अपेक्षा पूर्ण करू शकला नाही. सॅमने या मोसमात एकूण 12 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने फलंदाजीत 216 धावा आणि गोलंदाजीत फक्त 7 विकेट्स घेतल्या आहेत.
3 / 5
आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्ससाठी मैदानात उतरणारा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरनेही पूर्णपणे निराश केलें. मुंबईने त्याला 8 कोटींना विकत घेतले. गोलंदाजीतही काही धार दिसली नाही मात्र यंदाही दुखापतीमुळे तो त्रस्त दिसला आता तर तो मोसमोतूनच बाहेर पडला आहे. 5 सामने खेळतान त्याला फक्त 2 विकेट मिळवता आल्या.
4 / 5
या यादीत सनरायझर्स हैदराबादचा हॅरी ब्रूक पहिल्या क्रमांकावर आहे. हॅरी ब्रूकला सनरायझर्सने 13.25 कोटींना विकत घेतले पण तो आपल्या संघासाठी पूर्णपणे फ्लॉप दिसत होता. या मोसमात त्याच्या बॅटमधून पहिलं शतक झळकावलं असलं, तरी त्याला त्याच्या योग्यतेनुसार संघासाठी खेळ दाखवता आला नाही.
5 / 5
दिल्ली कॅपिटल्सने या मोसमात वेगवान गोलंदाज मुकेश कुमारवरही मोठी बोली लावली. फ्रँचायझीने त्याला तब्बल 5.25 कोटींना विकत घेतले. जरी तो त्यानुसार कामगिरी करू शकला नाही. मुकेशला 9 सामन्यात खेळण्याची संधी मिळाली ज्यात त्याला फक्त 7 विकेट घेता आल्या.