आयपीएलमध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नावावर अनेक विक्रमाची नोंद आहे. कर्णधार, फलंदाज आणि विकेटकीपर म्हणून त्याने मैलाचे दगड गाठले आहेत. आयपीएल 2023 स्पर्धेत त्याच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे. (PC-BCCI/IPL)
चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात पहिला सामना आहे. नाणेफेकीचा कौल गुजरातने जिंकला आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण नाणेफेकीच्या कौल झाला तेव्हा धोनीच्या नावावर विक्रमाची नोंद झाली. धोनी सर्वात वयस्कर कर्णधार झाला आहे. धोनीचं वय 41 वर्षे 249 दिवस आहे. (PC-BCCI/IPL)
धोनीपूर्वी हा विक्रम राजस्थानचा माजी कर्णधार शेन वॉर्नच्या नावावर होता. त्याचं वय तेव्हा 41 वर्षे 249 दिवस इतकं होतं. वॉर्न 2011 पर्यंत राजस्थानचा कर्णधार होता. आता हा विक्रम धोनीच्या नावावर आहे. (PC-BCCI/IPL)
आयपीएल सुरु झाल्यापासून धोनी चेन्नई सुपर किंग्सचं नेतृत्व करत आहे. वयस्कर कर्णधार म्हणून त्याच्या नावावर आयपीएल जेतेपद जिंकण्याचा विक्रम आहे. धोनी 40 वर्षे 70 दिवसांचा असताना जेतेपद जिंकलं आहे. धोनीने वर्ष 2021 मध्ये आयपीएल जेतेपद जिंकलं होतं. (PC-BCCI/IPL)
धोनी या स्पर्धेत भलेही सर्वात वयस्कर कर्णधार असला तरी चेन्नईला पाचव्यांदा जेतेपद मिळवून देण्याची धमक आहे. धोनीची ही शेवटची आयपीएल स्पर्धा असेल अशी सध्या चर्चा रंगली आहे. (PC-BCCI/IPL)