IPL 2023 RCB VS DC : दिनेश कार्तिकच्या नावावर नकोसा विक्रम, नेमकं काय केलं ते वाचा
IPL 2023 : आयपीएल 2023 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विकेटकीपर खराब फॉर्मात आहे. आतापर्यंतच्या चार सामन्यात काही खास करू शकला नाही. उलट त्याच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे.
1 / 5
दिनेश कार्तिकनं 2022 च्या आयपीएल स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली होती. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला टी 20 वर्ल्डकपमध्ये स्थान मिळालं होतं. त्यामुळे त्याचे चाहतेही खूश होते. मात्र आता त्याच्यावर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. (Photo : Twitter)
2 / 5
आयपीएल 2023 स्पर्धेतील चार सामन्यात दिनेश कार्तिक काही खास करू शकलेला नाही. इतकंच काय तर नकोसा विक्रम आपल्या नावावर केला आहे. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यानंतर आता दिल्ली विरुद्धच्या सामन्यातही भोपळा फोडला आला नाही. (Photo : Twitter)
3 / 5
आयपीएल 2023 स्पर्धेत आतापर्यंत त्याने 10 धावा केल्या आहेत. फलंदाजी सरासरी फक्त 3.33 इतकी आहे. मागच्या आयपीएलमध्ये कार्तिकने 16 सामन्यात 330 धावा केल्या होत्या. (Photo : Twitter)
4 / 5
आयपीएल सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याच्या विक्रमाची त्याने बरोबरी केली आहे. दिनेश कार्तिक आणि मनदीप सिंह हे दोघं 15 वेळा शून्यावर बाद झाले आहेत. त्यानंतर पियुष चावला (14), रोहित शर्मा (14), सुनील नरेन (14), हरभजन सिंह (13) आणि मनिष पांडे (13) वेळा शून्यावर बाद झाले आहेत. (Photo : Twitter)
5 / 5
दिनेश कार्तिक 2008 पासून आयपीएल खेळत आहे. आतापर्यंत दिनेश कार्तिक 233 सामने खेळला असून 4386 धावा केल्या आहेत. त्याने 132.34 च्या सरासरीने धावा केल्या. 97 हा त्याची सर्वोत्कृष्ट धावसंख्या आहे. (Photo : Twitter)