Marathi News Photo gallery IPL 2023 Team india cricketer mayank agarwal father in law becomes cbi director praveen sood latest marathi sport news
IPL 2023 दरम्यान टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूचे सासरे बनले ‘सीबीआय’चे डायरेक्टर, अनेक वर्ष सुरू होतं दोघांचं अफेर!
Follow us on
आयपीएलदरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा युवा खेळाडूचे सासरे प्रवीण सूद यांची सीबीआय डायरेक्टरपदी निवड झाली आहे. टीम इंडियामधील हा खेळाडू आणि प्रवीण सूद यांच्या मुलीसोबत तो गेले अनेक वर्षे रिलेशनशीपमध्ये होता. दोघांनी एकमेकांना जवळपास सात वर्षे डेट केलं होतं.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रवीण सूद 25 मे रोजी नवीन जबाबदारी स्वीकारू शकतात. सध्याचे संचालक सुबोध कुमार जैस्वाल यांचा कार्यकाळ 25 मे रोजी संपत आहे. सूद यांचा जन्म 1964 मध्ये हिमाचल प्रदेशमध्ये झाला. आयआयटी दिल्लीतून पदवीधर झालेले सूद हे 1986 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.
प्रवीण सूदची मुलगी आशिता सूदचे भारतीय क्रिकेटर मयंक अग्रवालसोबतचे अफेअर जवळपास 7 वर्षे चालले. बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न केले. क्रिकेटरने लंडनमध्ये आशिताला प्रपोज केले. दोघांनी 4 जून 2018 रोजी लग्न केले होते.
1986 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सुबोध कुमार जैस्वाल यांच्या जागी नवीन सीबीआय संचालक म्हणून नियुक्त झालेले प्रवीण सूद हे 1986 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते कर्नाटकचे डीजीपीही राहिले आहेत. आता ते दोन वर्षांसाठी सीबीआयचे संचालक असतील.
मयंक अग्रवाल सध्या आयपीएल 2023 मध्ये व्यस्त आहे. त्याने 16 व्या मोसमात आतापर्यंत 9 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 9 डावात 20.78 च्या सरासरीने आणि 114.02 च्या स्ट्राईक रेटने 187 धावा केल्या. या मोसमात त्याला एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही. या मोसमात त्याची सर्वोच्च धावसंख्या 49 आहे.