IPL 2024 | आयपीएल इतिहासमधील टॉप 5 अनब्रेकेबल रेकॉर्ड, कधीच नाही मोडू शकणार
आयपीएलच्या 17 व्या मोसमाला पुढील महिन्यात सुरूवात होत आहे. आयपीएलची सुरूवात 2008 पासून सुरू झाली होती. आतापर्यंत झालेल्या 16 आयपीएलच्या स्पर्धांमध्ये अनेक मोठे-मोठे रेकॉर्ड रचले गेलेत. यामधील काही रेकॉर्ड असे आहेत जे आता तुटले जातील असं वाटत नाही. मात्र क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. काहीही होऊ शकतं. परंतु आयपीएलमधील असे पाच रेकॉर्ड जे मोडले जातील असं वाटत नाही. नेमके कोणते आहेत जाणून घ्या.
1 / 5
आयपीएलच्या टॉप 5 अनब्रेकेबल रेकॉर्डमध्ये आरसीबी संघाचं होम ग्राऊंड असलेलं चिन्नास्वामी स्टेडियमचाही समावेश आहे. याच मैदानावर 2013 मध्ये आरसीबी संघाने पुणे वॉरियर्स इंडियाविरुद्ध 263 धावा केल्या होत्या. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठा स्कोर होता. महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच आरसीबी संघाचा सर्वात कमी स्कोर 49 आहे.
2 / 5
आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून आतापर्यंत महेंद्र सिंह धोनी याने सर्वाधिक सामने खेळले आहेत. आयपीएलमध्ये आतापर्यंत 226 सामन्यांमध्ये कर्णधारपदाची धूरा सांभाळली आहे. दुसऱ्या स्थानावर रोहित शर्माअ सून त्याने158 सामन्यात मुंबईचे कर्णधारपदाची जबाबदारी पार पाडली आहे.
3 / 5
एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम खतरनाक फलंदाज ख्रिस गेल याच्या नावावर आहे. गेल याने 175 धावांची दमदार खेळी केली होती. आरसीबीने ज्यावेळी 263 धावा केल्या होत्या, तेव्हाच गेलने ही वादळी खेळी केली होती.
4 / 5
आयपीएलमधील एका मोसमात सर्वाधिक काढण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. विराट कोहली याने 2016 साली 973 धावा करत इतिहास रचला होता. या मोसमात विराटची बॅट तळपलेली पाहायला मिळाली होती. कारण विराटने चार शतके केल होतीत. कोणत्याही फलंदाजाला हा विक्रम मोडणं सोप्प जाणार नाही.
5 / 5
आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. गेलने आतापर्यंत 357 षटकार मारले आहेत. हा विक्रम कधीच मोडला जाणार नाही. कारण दुसऱ्या स्थानावर रोहित शर्मा आहे ज्याने या लीगमध्ये 257 षटकार ठोकले आहेत. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या एबी डिव्हिलियर्सने 251 षटकार ठोकले होते.