लग्नाआधीच गरोदर, 10 वर्षांच्या संसारानंतर पतीपासून विभक्त ; या अभिनेत्रीच्या आयुष्यात ‘प्रेम’ पुन्हा परतलं ?

| Updated on: Apr 26, 2024 | 3:00 PM

ही नामवंत अभिनेत्री तिच्या अनेक उत्तम कामांसाठी, फिल्म्ससाठी ओळखली जाते. प्रोफेशनल आयुष्याप्रमाणेच तिचं पर्सनल लाइफही खूप चर्चेत होतं. सहअभिनेत्याला डेट करणारी ही अभिनेत्री लग्नाआधीच गरोदर होती, नंतर त्या दोघांनी लग्नंही केलं, पण 10 वर्षांतच ते विभक्त झाले. आता ही अभिनेत्री पुन्हा प्रेमात पडल्याची चर्चा आहे. कोण आहे ही अभिनेत्री, तिचं नाव काय ?

1 / 7
ही नामवंत कलाकार बॉलिवूडमधील सर्वात प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे. या अभिनेत्रीने पडद्यावर अनेक उत्तम व्यक्तिरेखा साकारल्या आहेत, ज्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले. प्रोफेशनल लाइफमध्ये यशस्वी असलेली ही अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. या अभिनेत्रीच्या आयुष्यात पुन्हा प्रेमाने प्रवेश केला आहे.

2 / 7
 ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून कोंकणा सेन शर्मा आहे. कोंकणाने तिच्या दमदार अभिनयाने इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रत्येक पात्राला 100 टक्के देण्यासाठी ती प्रसिद्ध आहे.

3 / 7
2001 साली आलेल्या 'मिस्टर अँड मिसेस अय्यर' या चित्रपटातील भूमिकेमुळे कोंकणा खूप चर्चेत आली. या चित्रपटातील तिच्या दमदार अभिनयाचे खूप कौतुक झाले आणि तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला.

4 / 7
यानंतर 2007 साली 'ओंकारा'मध्ये इंदूच्या भूमिकेतून कोंकणाला खूप प्रसिद्धी मिळाली. या पात्रासाठी कोंकणाला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. पेज थ्री, वेक अप सिड, असे अनेक हिट चित्रपट देणारी कोंकणा यशस्वी अभिनेत्री ठरली.

5 / 7
आपल्या प्रोफेशनल लाइफमध्ये खूप यशस्वी असलेली कोंकणा तिच्या लव्ह लाईफमुळेही चर्चेत होती. अभिनेत्रीने 2007 मध्ये रणवीर शौरीला डेट करायला सुरुवात केली होती. ते दोघे लिव्ह इन मध्ये रहात होते. 2010 साली ती लग्नापूर्वीच प्रेग्नंट होती, त्यानंतर रणवीर आणि कोकणा यांचे लग्न झाले.

6 / 7
लग्नानंतर कोंकणा आणि रणवीरने 2011 मध्ये मुलाचे स्वागत केले. पण रणवीर आणि कोंकणा यांचे लग्न फार काळ टिकले नाही. आणि 10 वर्षानंतर 2020 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. घटस्फोट घेण्याआधीच त्या दोघांनी वेगळं राहायला सुरुवात केली होती.

7 / 7
आता पुन्हा एकदा कोकणच्या आयुष्यात प्रेमाने प्रवेश केल्याची चर्चा आहे. रिपोर्ट्सनुसार, कोंकणा प्रसिद्ध अभिनेता अमोल पराशरला डेट करत आहे. तो तिच्यापेक्षा लहान असून दोघांनीही  डॉली किट्टी और वो चमकते सितारे या चित्रपटात एकत्र काम केलं आहे. त्यांच्या नात्याबद्दल बऱ्याच चर्चा आहेत, पण त्या दोघांपैकी कोणीच यावर मौन सोडलेलं नाही.