छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिराला जे.पी.नड्डा यांची हजेरी
महेश घोलप |
Updated on: May 18, 2023 | 3:06 PM
कर्ज, शिष्यवृत्ती तसेच अर्थसहाय्य मिळविण्याचे मार्ग या शिबिराद्वारे मिळणार असून युवा पिढी सोबतच त्यांच्या पालकांना देखील समुपदेशन, मार्गदर्शन या शिबिराच्या माध्यमातून केले जात आहे. देशाच्या स्वातंत्र्य अमृतमहोत्सवी वर्ष ७५ हजार नोकऱ्या देण्याचे शासनाचे उद्दीष्ट आहे.
1 / 5
छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिराचे आज मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर येथे आयोजन करण्यात आले होते. भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत हे शिबिर संपन्न झाले.
2 / 5
युवा पिढीच्या बळावर आपला देश महाशक्तीकडे वाटचाल करत असून संपूर्ण जगभरात आज भारताचे नाव मोठ्या अभिमानाने घेतले जाते. देशाची अर्थव्यवस्था ११ व्या स्थानावरून ५ व्या स्थानावर आणण्याचे काम आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांनी केले. जी२०चे अध्यक्षपद भारताला मिळणे ही देशासाठी अभिमानाची बाब आहे.
3 / 5
देशाचे भवितव्य तुमच्या हातात आहे असे युवकांना स्पष्ट करित तरुणांना चांगले विचार दिले पाहिजेत, तरुणांच्या हाताला काम दिले पाहिजे असे मत व्यक्त केले. त्यासाठीच अशा शिबीरांचे आयोजन केले जात आहे हे प्रशंसनीय आहे असे बोलताना नमूद केले.
4 / 5
युवा संवाद या कार्यक्रमाच्या आयोजनामागे शासनाची ठाम भूमिका आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून युवकांना त्यांच्या करिअरमध्ये मार्गदर्शन करण्याचा तसेच सरकारच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
5 / 5
कर्ज, शिष्यवृत्ती तसेच अर्थसहाय्य मिळविण्याचे मार्ग या शिबिराद्वारे मिळणार असून युवा पिढी सोबतच त्यांच्या पालकांना देखील समुपदेशन, मार्गदर्शन या शिबिराच्या माध्यमातून केले जात आहे. देशाच्या स्वातंत्र्य अमृतमहोत्सवी वर्ष ७५ हजार नोकऱ्या देण्याचे शासनाचे उद्दीष्ट आहे. यापूर्वी राजभवनात पार पडलेल्या कार्यक्रमात १ लाख २५ हजार नोकऱ्यांचे करार केले गेले असून त्यातून ६० हजार लोकांना रोजगार दिले गेल्याचेही यावेळी बोलताना स्पष्ट केले. यावेळी कौशल्य,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार आशिष शेलार, कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, कौशल्य विकास विभागाचे आयुक्त एन.रामास्वामी यांसह इतर मान्यवर उपस्थित आहेत.