सोशल मीडियावर जॅकलिननं 46 मिलियन फॉलोअर्सचा टप्पा गाठला आहे. यात केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील चाहत्यांचा समावेश आहे.
46 मिलियन फॉलोअर्सचा टप्पा गाठल्यानंतर जॅकलिननं चाहत्यांसाठी काही टॉपलेस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोसोबत तिनं 'थँक्यू, लव्ह यू' असं कॅप्शन दिलं आहे.
जॅकलिननं इन्स्टाग्रामवर 3 फोटो शेअर केले आहेत आणि चाहत्यांचे आभार मानले आहे. गुलाबाच्या गुच्छासोबत तिनं हा फोटोशूट केला आहे.
तिचे फोटो चाहत्यांच्याच नाही तर अनेक कलाकारांच्याही पसंतीस आले आहेत.
जॅकलिन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते. त्यामुळे तिला फॉलो करणाऱ्यांची संख्याही वाढत चालली आहे.