PHOTO : पहाटे घराला आग, झोपेतच नवरा-बायकोचा होरपळून मृत्यू
जामनेर तालुक्यातील गारखेडा इथे एका घराला आग लागून पती-पत्नीचा होरपळून मृत्यू झाला. उत्तम श्रावण चौधरी आणि वैशाली उत्तम चौधरी असे आगीत मृत्यू झालेल्या पती पत्नीचे नाव आहे.
यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र घराचा दरवाजा आतून बंद असल्याने अखेर दरवाजा तोडून गावकऱ्यांनी आत प्रवेश मिळवला.
Follow us on
जळगाव : जामनेर तालुक्यातील गारखेडा इथे एका घराला आग लागून पती-पत्नीचा होरपळून मृत्यू झाला. उत्तम श्रावण चौधरी आणि वैशाली उत्तम चौधरी असे आगीत मृत्यू झालेल्या पती पत्नीचे नाव आहे.
जामनेर तालुक्यातील गारखेडा इथे पहाटेच्या 3 ते 4 च्या सुमारास ही घटना घडली. उत्तम चौधरी यांच्या घराला पहाटेच्या सुमारा आग लागली.
त्यावेळी चौधरी दाम्पत्य घरात झोपलेले होते. आगीचा भडका पाहून तेथून जाणाऱ्या ट्रक चालकाने ट्रक थांबवून, गावातील नागरिकांना झोपेतून उठवून त्याबाबतची माहिती दिली.
यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र घराचा दरवाजा आतून बंद असल्याने अखेर दरवाजा तोडून गावकऱ्यांनी आत प्रवेश मिळवला.
घरात प्रवेश केल्यानंतर गावकऱ्यांना जे दिसलं ते अत्यंत धक्कादायक होतं. पती-पत्नी आगीच्या भक्षस्थानी पडले होते. दोघांचाही होरपळून मृत्यू झाला होता.
दरम्यान ही आग नेमकी कशी लागली, आगीचं नेमकं कारण काय हे समजू शकले नाही.