Jalgaon Gold : जळगावमध्ये सोन्याची  92 हजारी सलामी, तर चांदीचा पाडव्यापूर्वीच कहर, ग्राहकांना आली भोवळ

| Updated on: Mar 28, 2025 | 2:47 PM

Jalgaon Sarafa Market : जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दराने पुन्हा मोठी उसळी घेतली असून सोन्या चांदीचे दर हे विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहेत. दोन्ही धातुनी पाडव्यापूर्वीच महागाईची गुढी उभारली. त्यामुळे ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

1 / 6
सोन्याच्या दरात एका दिवसात 1300 रुपयांनी वधारले. जळगावच्या सराफ बाजारात इतिहासात पहिल्यांदाच सोने 92 हजार रुपयांवर पोहोचले आहे. जीएसटीसह सोन्याचे दर हे 92 हजारांवर पोहोचले आहे.

2 / 6
चांदीच्या दरात 1 हजारांनी वाढ झाली असून  चांदीचे दर 1 लाख 5 हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहे. गुढीपाडव्याच्या दोन दिवस आधी सोन्याच्या दरात वाढ झाल्याने ग्राहकांचा हिरमोड झाला आहे.

3 / 6
गेल्या दोन दिवस आधी जळगावच्या सुवर्ण नगरीत 88 हजारावर असलेल्या सोन्याचे दर जीएसटीसह 92 हजार पर्यंत पोहोचले आहेत. आजचे दर हे जळगावच्या सराफ बाजाराच्या इतिहासातले सोन्याचे सर्वात जास्त म्हणजेच विक्रमी दर आहेत

4 / 6
दोन दिवसांवर गुढीपाडवा असून मुहूर्तावर सोना खरेदी करण्याच्या विचारात असलेल्या ग्राहकांचा सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाल्यामुळे खरेदीसाठी हिरमोड झाला आहे. जळगावच्या सुवर्णनगरीत ग्राहकांचा काहीसा कमी प्रतिसाद दिसून येत असून सुवर्ण नगरीमध्ये शुकशुकाट दिसत आहे.

5 / 6
आंतरराष्ट्रीय बाजारात निर्माण झालेले अस्थिरता तसेच 2 एप्रिल रोजी यूएसए चा सेलिब्रेशन दिवस असल्याने ट्रारिफ रेट लागू होणार असल्याची शक्यता परिणामी सोन्याच्या दरात वाढ झाली असल्याची प्रतिक्रिया सुवर्ण व्यवसायिक यांनी दिली.

6 / 6
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA)  24 कॅरेट सोने 88,417,  23 कॅरेट 88,063,  22 कॅरेट सोने 80,990 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 66,313 रुपये, 14 कॅरेट सोने 51,724 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 99,775 रुपये इतका झाला.