साध्या पद्धतीने लग्न अन् मग मनोज जरांगे यांचे आशिर्वाद; नवविवाहित दाम्पत्य जरांगेंच्या भेटीला

| Updated on: Jan 01, 2024 | 3:43 PM

Newly Married Couple Meets Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे वारंवार साध्या पद्धतीने लग्न करण्याचं आवाहन करतात. त्याच्या या आवाहनाला एका जोडप्याने सकारात्मक प्रतिसाद दिला. साध्या पद्धतीने या जोडप्याने लग्न केलं. त्यानंतर ते जरांगे यांचे आशिर्वाद घेतले.

1 / 5
संजय सरोदे, प्रतिनिधी-टीव्ही 9, अंतरवाली सराटी, जालना | 01 जानेवारी 2024 : मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील लढा देत आहेत. आरक्षणाची मागणी त्यांनी लावून धरली आहे.

2 / 5
लवकरच मनोज जरांगे पाटील मुंबईत येऊन आंदोलन करणार आहेत. उपोषण करणार आहेत. मात्र त्या आधी नवदाम्पत्याने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यांचे आशिर्वाद घेतले.

3 / 5
मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाचा आरक्षण मागणी करत असताना ते नेहमी मराठा समाजाला लग्न करताना कुठलाही खर्च न करता लग्न करण्याचे आवाहन करत असतात. त्यांच्या याच आवाहनाला या जोडप्याने सकारात्मक प्रतिसाद दिला.

4 / 5
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील धोंडराई येथील गणेश खरात आणि बीडच्या अक्षरा कानडे यांनी कुठलाही खर्च न करता लग्न केलं. या लग्नाला बीड भागात गेटकीन लग्न म्हणतात, असे लग्न या दोघांनी केलं.

5 / 5
साध्या पद्धतीने लग्न केल्यानंतर गणेश आणि अक्षरा या नवविवाहित जोडप्याने मनो जरांगे पाटील यांनी भेट घेतली. या जोडप्याने आज अंतरवाली सराटी येथे येऊन जरांगे पाटील यांचे आशीर्वाद घेतले.