सचिन तेंडूलकरांनी पाहिलं ‘जाणता राजा’नाटकं, मान्यवरांनी केलं कौतुक
महेश घोलप |
Updated on: Mar 19, 2023 | 12:13 PM
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित ‘जाणता राजा’ या महानाट्याच्या रूपाने सर्व मुंबईकरांना पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रातील थरारकपणाचा विलोभनीय अनुभव घेण्याची संधी मिळाली आहे.
1 / 6
आमचे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर मुंबईतील शिवतीर्थ येथे 'जाणता राजा' या पौराणिक महाकाव्य नाटकाच्या मंचावर असणे हा एक आनंददायी क्षण होता असं अशिष शेलार यांनी सोशल मीडियाच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
2 / 6
'जाणता राजा'नाटक आतापर्यंत अनेकांनी पाहिलं आहे, त्याचबरोबर त्याच कौतुक देखील केलं आहे.
3 / 6
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित ‘जाणता राजा’ या महानाट्याच्या रूपाने सर्व मुंबईकरांना पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रातील थरारकपणाचा विलोभनीय अनुभव घेण्याची संधी मिळाली आहे.
4 / 6
प्रयोगाला प्रेक्षकांनी तुफान गर्दी करत महाराजांवरील प्रेमाची अनुभूती दिली.
5 / 6
6 / 6
'जाणता राजा' च्या पाचव्या प्रयोगाला महिला व बालविकास कल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा, भारतरत्न सचिन तेंडुलकर, ‘महाराष्ट्र शाहीर’ सिनेमाचे दिग्दर्शक केदार शिंदे, अभिनेते अंकुश चौधरी, अभिनेत्री सना शिंदे, मुंबई मनपाचे असिस्टंट कमिशनर चवरे साहेब, नगरसेवक विनोद शेलार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.