टीम इंडियाचा यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) प्रसिद्ध क्रीडा निवेदिका संजना गणेशनसोबत (sanjana ganesan) विवाहबद्ध झाला आहे.
क्रिकेटपटू जसप्रीत बुमराह (jasprit bumrah) आणि स्पोर्ट्स अँकर संजना गणेशन (sanjana ganesan) विवाहबद्ध झाले आहेत.
संजना ही प्रसिद्ध स्पोर्ट्स प्रेजेंटेटर आहे. ती सध्या स्टार स्पोर्ट्ससोबत काम करत आहे. संजनाने आतापर्यंत अनेक कार्यक्रम होस्ट केले आहेत. संजना स्पिलिट्सविला या रिअॅलिटी शोच्या 7 व्या मोसमातही सहभागी झाली होती. तसेच संजनाने 2014 मध्ये मिस इंडिया या सौंदर्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवलं होतं.
जसप्रीत बुमराहने विवाहासाठी इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीतून आणि टी 20 मालिकेतून माघार घेतली होती.