Photo : ‘जया भादुरी ते जया बच्चन’; फिल्मी दुनियेतील गुड्डीच्या आयुष्यातील खासमखास गोष्टी
VN |
Updated on: Apr 09, 2021 | 1:52 PM
लग्नानंतर जया बच्चन बनलेल्या अभिनेत्री जया भादुरी हिंदी चित्रपटसृष्टीतल्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहेत. सत्यजित रे आणि हृषिकेश मुखर्जी यासारख्या निर्माते आणि दिग्दर्शकांनी त्यांच्यातील अभिनयाची प्रतिभा ओळखली होती. (‘Jaya Bhaduri to Jaya Bachchan’; Highlights of Jaya Bachchan's Life)
1 / 7
लग्नानंतर जया बच्चन (Jaya Bachchan) बनलेल्या अभिनेत्री जया भादुरी हिंदी चित्रपटसृष्टीतल्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहेत. सत्यजित रे आणि हृषिकेश मुखर्जी यासारख्या निर्माते आणि दिग्दर्शकांनी त्यांच्यातील अभिनयाची प्रतिभा ओळखली होती.
2 / 7
चित्रपटसृष्टीबरोबरच राजकारणातही नाव कमवणाऱ्या अशा मोजक्या कलाकारांपैकी जया बच्चन एक आहेत. चित्रपटांमध्ये सक्रिय असताना त्यांनी तीन सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि तीन सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री पुरस्कारांसह नऊ फिल्मफेअर पुरस्कार जिंकले आहेत.
3 / 7
अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासोबत लग्न गाठ बांधून त्यांनी बच्चन कुटुंबात प्रवेश केला. मात्र, हरिवंशराय बच्चन यांच्या एका अटीमुळे हे लग्न पार पडले होते.
4 / 7
जया बच्चन यांनी वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली. 1963 मध्ये सत्यजित रे यांचा बंगाली चित्रपट ‘महानगर’मध्ये जया यांनी सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका केली होती. येथूनच जया यांनी स्वप्न जगण्यास सुरुवात केली. 1971मध्ये ‘गुड्डी’ या चित्रपटाद्वारे त्यांनी बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. यानंतर अभिनेत्रीने ‘मिली’, ‘चुपके चुपके’, ‘जंजीर’ यासारखे अनेक सुपरहिट चित्रपट दिले.
5 / 7
‘गुड्डी’ या चित्रपटाच्या सेटवर अमिताभ बच्चन आणि जया यांची भेट झाली होती. या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले होते. या चित्रपटानंतर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. जया भादुरी आणि राजेश खन्ना एकत्र काम करत असलेल्या ‘बावर्ची’ या चित्रपटाच्या सेटवर अमिताभ सतत जया यांना भेटायला जात असत आणि त्यामुळे दोघांचे प्रेम आणखी वाढत गेले.
6 / 7
अमिताभ आणि जया यांचे लग्न अचानक झाले होते. ‘जंजीर’ चित्रपटाच्या यशानंतर सर्व मित्र सेलिब्रेशनसाठी लंडनला जाण्याची तयारी करत होते, जया देखील त्यांच्यासोबत लंडनला जाणार होत्या. मात्र, वडील हरिवंशराय बच्चन यांच्या अटीमुळे दोघांनाही त्याच दिवशी लग्न करावे लागले.
7 / 7
लंडनला जाणाऱ्या मित्रपरिवारात जया देखील आहेत, हे जेव्हा हरिवंश राय बच्चन यांना समजले तेव्हा ते म्हणाले की, जया आणि अमिताभ यांना लंडनला एकत्र जायचे असेल तर, दोघांनाही आधी लग्न करावे लागेल. याच कारणास्तव, दोघांनी लंडनला जाण्यापूर्वी 3 जून 1973 रोजी एका साध्या घरगुती सोहळ्यात लग्न केले आणि त्याच दिवशी दोघे हनिमूनसाठी थेट लंडनला रवाना झाले होते.