Marathi News Photo gallery Jaya ekadashi 2022 On the occasion of Magh Shuddha Jaya Ekadashi, flowers are laid on the temple of Shri Vitthal.
Jaya Ekadashi 2022 | टाळ मृदुंगाच्या गजरात श्री विठ्ठल नामाचा जयघोष, माघ शुध्द जया एकादशी निमित्ताने श्री विठ्ठल मंदिराला फुलांची आरास
माघ शुध्द जया एकादशी निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक नयनरम्य अशी फुलांची आरास करण्यात आली आहे.श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचा गाभारा ,सोळखांबी,चारखांबि तसेच मंदिराच्या विविध भागांना आरास करण्यात आली आहे.
1 / 6
माघ शुध्द जया एकादशी निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक नयनरम्य अशी फुलांची आरास करण्यात आली आहे.श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचा गाभारा ,सोळखांबी,चारखांबि तसेच मंदिराच्या विविध भागांना झेंडु ,आष्टर ,ग्लेंडर , केशरी झेंडु , निळ्या रंगाचा ब्ल्यु डेझी ,पिवळा झेंडु ,कामिनी, पांढऱ्या रंगाचा टौटिस , गुलाब , शेवंती ,ड्रेसिना ,औरकेड अशा विविध आकर्षक अशा फुलांची आरास करण्यात आली आहे. यासाठी जवळपास दोन टन फुलांचा वापर करण्यात आला आहे.
2 / 6
विविध रंगाच्या फुलांनी देवाचा गाभारा उजळून निघाला आहे.विठुरायाचे आजचे गोजिरे रूप अधिकच खुलुन दिसत आहे. ही सजावट पुणे येथील विठ्ठल भक्त सचिन चव्हाण आणि संदीप पोकळे यांनी केली आहे.
3 / 6
माघशुध्द जया एकादशी निमित्त श्री विठ्ठल रूक्मिणी मातेची महापुजा संपन्न झाली आहे. मंदिर समितीचे सदस्य अतुलशास्त्री भगरे यांनी सपत्निक श्री विठ्ठल रुक्मिणीमातेची महापुजा केली.
4 / 6
कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर भरणारी ही पहिलीच माघीवारी असल्याने. माघवारी सोहळ्यासाठी राज्याच्या विविध भागातून जवळपास तीन लाख भाविक आज पंढरीत दाखल झाले आहे.
5 / 6
हिंदू धर्मात प्रत्येक व्रताला विशेष महत्त्व आहे, या यादीत एकादशी व्रताचा समावेश आहे . हिंदू कॅलेंडरनुसार, माघ (Magh) महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला भाविक जया एकादशीचे व्रत करतात . या वर्षी 2022 मध्ये, जया एकादशीचे व्रत फेब्रुवारीचे 12 सजरा करण्यात येत आहे.
6 / 6
2022 मध्ये माघ शुक्ल एकादशी 11 फेब्रुवारी रोजी दुपारी 01:52 पासून सुरू होत आहे, जी 12 फेब्रुवारी रोजी दुपारी 04:27 पर्यंत चालणार आहे. अशा स्थितीत 12 फेब्रुवारीला जया एकादशीचे व्रत ठेवण्यात येणार आहे. या दिवसाचा शुभ मुहूर्त दुपारी 12:13 ते 12:58 पर्यंत आहे.