सार्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा देवाची सोमवती अमावस्या यात्रा आज संपन्न झाली.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या यात्रेसाठी कोणत्याही भाविकांनी जेजुरीत येऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले होते.
सोमवती यात्रेनिमित्त सकाळी सहा वाजता मोजके पुजारी, मानकरी , खांदेकरी आणि विश्वस्त यांच्या उपस्थितीमध्ये खंडोबा म्हाळसादेवीच्या मूर्तींना दहीदुधाचा अभिषेक घालण्यात आला.
अभिषेक झाल्यानंतर सजवलेल्या गाडीतून उत्सवमूर्तीना कऱ्हेकाठावर नेऊन कऱ्हा नदीच्या पाण्याचे स्नान घालण्यात आले.
सोमवतीला दरवेळी पालखी वाजत गाजत कऱ्हा नदीवर स्नानासाठी नेली जाते परंतु यावेळी कोरोनाच्या सावटामुळे सजवलेल्या गाडीतून उत्सवमूर्तीना कऱ्हेकाठावर नेण्यात आले.
कऱ्हा काठावर पूजा अभिषेक झाल्यानंतर आरती करण्यात आली. मोजक्याच पुजारी व मानकऱ्यांच्या उपस्थितीत सोमवती सोहळा पार पडला.