मुंबईच्या जुहू बीचवर आज सकाळी जेलीफिश फिरायला गेलेल्या लोकांना पाहायला मिळाले आहेत. सध्या सफाई कर्मचाऱ्यांनी साफसफाई केली असून लोकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.
जुहू बीचवर वेगवेगळ्या ठिकाणी जेलीफिश पसरलेले पाहायला मिळाले आहेत. सध्या जेलीफिश शूज आणि पायाला चिकटत असल्याने पर्यटकांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
जुहू बीचच्या किनाऱ्यावर जेलिफिश आल्याने पर्यटकांनी जुहू चौपाटी सह अन्य चौपाट्यांवर ब्ल्यू बॉटल जेलीफिश पासून स्वतः चं संरक्षण करावं असं आवाहन जुहू चौपाटीचे जीवरक्षक रवि वाढवे यांनी पर्यटकांना केलं आहे.