उन्हाळ्यात परफेक्ट लुक हवा असेल तर हे ट्रेंडी जंपसूट नक्की ट्राय करून पाहा
उन्हाळ्यात स्टायलिश दिसण्यासाठी कोणत्या प्रकारचे जंपसूट ट्राय करायचे याबाबत बर्याच महिला कन्फ्यूज असतात. तर आज आपण अशाच काही हटके जंपसूटबाबत जाणून घेणार आहोत जे घातल्याने उन्हाळ्यात तुमचा लुक एकदम स्टायलिश आणि कुल दिसेल.
1 / 5
सध्या गरमीचे दिवस सुरू आहेत त्यामुळे स्त्रिया नेहमी सॉफ्ट आउटफिट घालण्यावर भर देतात. त्यात बहुतेक महिलांना जंपसूट घालायला आवडतं. पण उन्हाळ्यात स्टायलिश दिसण्यासाठी कोणत्या प्रकारचे जंपसूट ट्राय करायचे याबाबत बर्याच महिला कन्फ्यूज असतात. तर आज आपण अशाच काही हटके जंपसूटबाबत जाणून घेणार आहोत जे घातल्याने उन्हाळ्यात तुमचा लुक एकदम स्टायलिश आणि कुल दिसेल.
2 / 5
जंपसूट कलेक्शनसाठी तुम्ही काही बॉलिवूड सेलेब्सच्या लूकपासून प्रेरणा घेऊ शकता. या प्रकारच्या जंपसूटमध्ये तुम्ही खूप स्टायलिश आणि हटके दिसाल. तर आज आपण सेलिब्रिटींच्या जंपसूट लुकबाबत जाणून घेणार आहोत. वरील फोटोत अभिनेत्री सान्या मल्होत्राने कट-आउट ब्रास रंगाचा जंपसूट घातला आहे. यावर तिने चंकी गोल्ड अॅक्सेसरीज घातली आहे. तिचा हा ड्रेस सिग्नेचर टेक्सचर्ड शिफॉनमध्ये डिझाइन केलेला आहे. तर तुम्हीही सान्या मल्होत्रासारखा हटके लूक ट्राय करू शकता.
3 / 5
रिया चक्रवर्तीने अतिशय सुंदर असा बॅकलेस जंपसूट घातला आहे. हा ब्लॅक कलरच्या जंपसूटमध्ये रिया एकदम क्लासी दिसत आहे. तुम्हीही रियासारखा हा बॅकलेस जंपसूट परिधान करू शकता. उन्हाळ्यात या जंपसूटमध्ये तुम्ही नक्कीच स्टायलिश दिसाल.
4 / 5
जर तुम्हाला डेनिम घालायला आवडत असेल तर तुम्ही डेनिम जंपसूट नक्की ट्राय करा. वरील फोटोत अभिनेत्री रकुल प्रीतने वाइड लेग बॉटम जंपसूट परिधान केला आहे. तिच्या या जंपसूटला ट्यूब नेकलाइन आहे. तर तुम्हीही रकुल सारखा हा वाइड लेग बॉटम जंपसूट ट्राय करू शकता. यात तुमचा लुक हटके दिसेल.
5 / 5
कीर्ती सुरेशने ब्लॅक कलरचा फ्लोरल जंपसूट परिधान केला आहे. या जंपसूटमध्ये कॉर्सेट स्टाइल टॉप आहे. तसेच यावर लाल, हिरवा, निळा आणि पांढऱ्या रंगात फ्लॉवर प्रिंट आहे. हा जंपसूट उन्हाळ्यात घालण्यासाठी एकदम कंफर्टेबल आणि परफेक्ट आहे. त्यामुळे नक्कीच ट्राय करा.