जोतिबाच्या चैत्र पौर्णिमेच्या यात्रेची भाविक आतुरतेनं वाट पाहात असतात. मंदिर परिसरातला गुलाबीसागर मन प्रसन्न करतो.. सासनकाठी नाचवणाऱ्या पाहिलं तर लक्षात येतं की भक्तीचा किती मोठा सोहळा आहे. पायी येणाऱ्या सासनकाठ्या आधीच मंदिर परिसरात दाखल झाल्या आहेत. एका खांद्यावर सासनकाठी घेऊन नाचणं हे भक्तांसाठी खूप मोठी पर्वणी असते.