चांगभलं रं देवा चांगभलं, दख्खनचा राजा जोतिबाच्या यात्रेस सुरुवात

| Updated on: Apr 16, 2022 | 11:50 AM

कोल्हापूर जिल्ह्यातील दख्खनचा राजा अशी ख्याती असणाऱ्या जोतिबाच्या चैत्र यात्रेचा मुख्य दिवस 16 एप्रिल असला तरी कामदा एकादशीच्या मुहूर्तावर जोतिबाच्या चैत्र यात्रेला प्रारंभ झालाय. त्यामुळे डोंगरावर भाविकाची मांदियाळी पाहायला मिळत आहे.

1 / 5

2 / 5
जोतिबाच्या चैत्र पौर्णिमेच्या यात्रेची भाविक आतुरतेनं वाट पाहात असतात. मंदिर परिसरातला गुलाबीसागर मन प्रसन्न करतो.. सासनकाठी नाचवणाऱ्या पाहिलं तर लक्षात येतं की भक्तीचा किती मोठा सोहळा आहे. पायी येणाऱ्या सासनकाठ्या आधीच मंदिर परिसरात दाखल झाल्या आहेत. एका खांद्यावर सासनकाठी घेऊन नाचणं हे भक्तांसाठी खूप मोठी पर्वणी असते.

3 / 5
 महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक डोंगरावर दाखल होत आहेत.   गुलाल खोबऱ्याची उधळण आणि बा जोतिबाच्या नावानं चांगभलंचा गजर यामुळे ज्योतिबा डोंगर आतापासूनच गुलालात न्हाहून निघाला आहे.

4 / 5
जोतिबाच्या नावानं चांगभलं…. दख्खनचा राजा जोतिबा माझा म्हणतं देशभरातले भाविक आज जोतिबा डोंगरावर उपस्थित राहिले. गुलाल खोबऱ्याची उधळण, ढोल आणि हालगीच्या तालावर नाचवल्या जाणाऱ्या सासनकाठ्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होत्या. नवसाला पावणारा देव म्हणून जोतिबा प्रसिद्ध आहे. त्यामुळं कोण नवस फेडायला तर कोण नव्यानं साकडं घालायला जोतिबा डोंगरावर येतो.

5 / 5
पहाटे नित्यनेमाची आरती व पूजा सकाळी दर्शनासाठी आठ ते दहा लाख भाविक जोतिबा डोंगरावर दाखल झाले आहेत. तर  दुपारी बारा वाजता पालखी व सासन काठी कार्यक्रम होणार आहे शरद ज्योतिबाची पूजा बांधण्यात आली ज्योतिबाच्या नावानं चांगभलं च्या जयघोषात यात्रेला सुरुवात झाली.