रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री काजल अग्रवालनं 2004 मध्ये विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या राय यांच्यासोबत बॉलिवूडची सुरुवात केली.
अभिनेता अजय देवगणच्या सिंघम सिनेमातील अभिनेत्री काजल अग्रवालचे चाहते टॉलिवूडपासून बॉलिवूडपर्यंत आहेत. एवढंच नाही तर काजलच्या सौंदर्याची स्तुती सर्वच जण करतात.
सध्या काजल अग्रवाल दाक्षिणात्य सिनेमातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. टॉलिवूडमध्ये तिने अनेक हिट सिनेमे दिले आहेत. शिवाय बॉलिवूडमध्येही तिने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे.
काजलच्या करिअरच्या सुरुवातीमध्ये ‘मगधीरा’ सिनेमाचा मोठा वाटा आहे. या सिनेमाने तिच्या करिअरमध्ये सर्वाधिक कमाई केली. बॉलिवूडमध्ये तिने सिंगम, स्पेशल 26, दो लफ्जो की कहानी यासारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे.
नुकतंच काजल उद्योगपती गौतम किचलू यांच्यासोबत लग्नबंधनात अडकली आहे. आता नवनवीन फोटोशूट करत ती चाहत्यांशी कनेक्ट होतेय.