PHOTO | कराडमध्ये कुत्र्यांची दहशत; नागरिक धस्तावले!

| Updated on: Nov 03, 2020 | 3:29 PM

गेल्या चार दिवसात दोन लहान मुलांसह पाच जणांवर या कुत्र्यांनी जीवघेणे हल्ले केले आहेत.

1 / 7
कराड शहरात मोकाट कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. गेल्या चार दिवसात दोन लहान मुलांसह पाच जणांवर या कुत्र्यांनी जीवघेणे हल्ले केले आहेत. त्यामुळे कराडकरांमध्ये सध्या दहशतीचं वातावरण आहे

2 / 7
गेल्या आठवड्यात श्री हॉस्पिटल परिसरात एका महिलेला मोकाट कुत्र्याने चावा घेतल्याची घटना ताजी असतानाच दोन लहान मुलांवर कुत्र्यांनी जीवघेणी हल्ला करुन जखमी केले आहे.

3 / 7
पहाटेच्या सुमारास व्यायाम अथवा दुचाकीवरुन जाणाऱ्या नागरिकांचा मोकाट कुत्र्यांचे कळप पाठलाग करतात. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

4 / 7
कराड शहरात विविध भागात मोकाट कुत्र्यांच्या झुंडीच्या झुडी पहायला मिळत आहेत.

5 / 7
शहरात दोन हजारांहून अधिक भटकी कुत्री असून पालिकेकडे अनेकदा मागणी करुनही कराड पालिकेने दुर्लक्ष केले आहे.

6 / 7
दक्ष कराडकर या ग्रुपच्या माध्यमातून शहरातील प्रशनांसह नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडणारे सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पाटील यांनी मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नगरपालिका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

7 / 7
पालिकेने कुत्र्यांचा त्वरीत बंदोबस्त न केल्यास भटकी कुत्री पालिकेत  सोडणार असल्याचा इशाराही दिला आहे.