इथं आहेत कर्णाची कवच कुंडल, नाही पोहचू शकत कोणताही मनुष्य
Karna Kavach Kundal : कर्ण हा दानशूर म्हणून ओळखल्या जातो. त्याची कवच कुंडल काढून घेण्यात आली होती. त्यानंतरच त्याचा अर्जुनाने वध केल्याची कथा आहे. ही कवच कुंडल आज कुठे आहेत? काय आहे याविषयीचा दावा
1 / 7
कर्ण हे महाभारतातील प्रमुख पात्रापैकी एक पात्र आहे. कर्णाच्या दानशूरपणाचे किस्से तुम्ही ऐकलेच असेल. कर्णाच्या दानशूरपणाच्या कथा परिचित आहेत. रात्री झोपताना आजी या कथा सांगत असते.
2 / 7
कर्ण हा पांडवांचा सर्वात मोठा भाऊ होता. कुणाला काहीही दान करण्याची दानत कर्णाशिवाय त्या काळी कुणाकडेच नव्हती. ते दान देताना विचार करत नसत.
3 / 7
कर्णाकडे जन्मजात कवच आणि कुंडल होती. या शक्तीमुळे त्यांना जगातील कोणतीही शक्ती हरवू शकत नव्हती.
4 / 7
देवांचा राजा इन्द्राने एका योजनेनुसार ही कवच आणि कुंडल कर्णाकडे मागितली. त्यासाठी इन्द्राला खोटं बोलावं लागल्याची कथा आहे. ही कवच-कुंडल थाप्पा मारून मिळवल्याने इंद्र देवाला स्वर्गात प्रवेश करता आला नसल्याची आख्यायिका आहे.
5 / 7
कवच कुंडल नसल्याने अर्जुनाला कर्णाचा वध करता आला. कवच कुंडलाची शक्ती नसल्याने कर्ण गतप्राण झाल्याची कथा आहे.
6 / 7
अशी मान्यता आहे की कर्णाची कवच कुंडल पुरी जवळील कोणार्क मध्ये लपविण्यात आले आहे. समुद्राच्या काठावर ते लपवण्यात आले आहे. सूर्य देव आणि समुद्र देव दोन्ही मिळून त्याची सुरक्षा करत आहेत.
7 / 7
सूचना : हे वृत्त लोक कथांवर आधारीत आहे. या वृत्तातील तथ्य आणि माहितीबाबत tv9 मराठी कोणतीही दावा करत नाही.