Marathi News Photo gallery Kartiki Ekadashi 2023 Mahapooja Maharashtra DCM Devendra Fadnavis and Amruta Fadnavis Nashik Ghuge Family Pandharpur Latest Marathi News
अविस्मरणीय पहाट… विठ्ठलाची कृपा; देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक कार्तिकी महापूजा
DCM Devendra Fadnavis and Amruta Fadnavis Kartiki Ekadashi 2023 Mahapooja : बा विठ्ठला... कृपा सदैव महाराष्ट्रावर राहू देत... सर्वांना सुखी ठेव, अशी प्रार्थना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठुरायाचरणीच्या चरणी केली. फडणवीसांच्या हस्ते शासकीय कार्तिकी महापूजा संपन्न झाली. त्याची काही क्षणचित्रे...
1 / 5
कार्तिकी एकादशीनिमित्त विठुराया आणि रखुमाईची महापूजा संपन्न झाली.राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते पार पडली.
2 / 5
यंदा नाशिकच्या घुगे दाम्पत्याला मानाचे वारकरी होण्याचा मान मिळाला. फडणवीसांसोबत बबन घुगे आणि सौ. वत्सला घुगे यांनी विठ्ठलाची मनोभावे पूजा केली.
3 / 5
आज पुन्हा एकदा सपत्नीक शासकीय पूजा करण्याचे सौभाग्य प्राप्त झालं. विठ्ठलाची कृपा सदैव महाराष्ट्रावर राहू देत, सर्वांना सुखी ठेव, अशी प्रार्थना देवेंद्र फडणवीस यांनी विठुरायाचरणी केली.
4 / 5
आज शेतीवर संकट आहे. अनेक भागात दुष्काळी स्थिती आहे. महाराष्ट्रात मराठा, धनगर यसह आदिवासी समाजाचे प्रश्न आहेत . विठुरायानी या सर्वांच्या मागण्या पूर्ण करण्याची ताकद विठ्ठलाने द्यावी, असं देवेंद्र फडणवीस, यावेळी म्हणाले.
5 / 5
विठ्ठल-रुक्मिणी मुख्य मंदिर आणि संकुल जतन तसंच दुरुस्ती आणि संवर्धन प्रकल्प कामाचा भूमिपूजन सोहळा यावेळी पार पडला. देवेंद्र फडणवीस आणि अमृता यांच्या हस्ते हे भूमीपूजन पार पडलं.