Photos : कचरा कुंडीच्या जागेवर पार्क फुलला, गॅस कंपनीच्या घुसखोरीने कल्याणमध्ये शिवसेना आक्रमक
ज्या जागेवर कचरा टाकला जात होता. त्या ठिकाणी सुसज्ज गार्डन तयार केले. आता त्या गार्डनमध्ये महानगर गॅसचे सब स्टेशन उभारल्याने सत्ताधारी पक्षाचे माजी नगरसेवक मोहन उगले यांच्यावर आंदोलन करण्याची वेळ आलीय.
-
-
ज्या जागेवर कचरा टाकला जात होता. त्या ठिकाणी सुसज्ज गार्डन तयार केले. आता त्या गार्डनमध्ये महानगर गॅसचे सब स्टेशन उभारल्याने सत्ताधारी पक्षाचे माजी नगरसेवक मोहन उगले यांच्यावर आंदोलन करण्याची वेळ आलीय.
-
-
कल्याण डोंबिवली महापालिका काही ना काही कारणामुळे वादग्रस्त ठरते. आता गार्डनवरील अतिक्रमणामुळे नवा वाद निर्माण झालाय. कल्याण पश्चिमेतील फडके मैदानाजवळ शिवसेनेचे माजी नगरसेवक मोहन उगले यांनी मेहनत करत आनंद दिघे नाना-नानी पार्क तयार केला.
-
-
या जागेवर गार्डन होण्याआधी डंपिंगच्या कचरा गाड्या उभ्या केल्या जात. लोक त्याठिकाणी कचरा टाकत. त्यामुळे तेथे प्रचंड दुर्गंधी अस्वच्छता पसरली. अखेर उगले यांनी या ठिकाणी पार्क विकसीत केला.
-
-
यानंतर या ठिकाणी वयोवृद्ध, मुले, महिला येतात आणि पार्कचा आनंद घेतात. सर्व काही व्यवस्थित सुरु असताना गार्डनच्या जागेत आता महानगर गॅस कंपनीच्या सब स्टेशन उभारले आहे.
-
-
महापालिकेने हे सब स्टेशन उभारण्यासाठी कशाच्या आधारे परवानगी दिली असा संतप्त सवाल माजी नगरसेवक मोहन उगले यांनी उपस्थित केला आहे.
-
-
उगले म्हणाले, “या सब स्टेशनमुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झालाय. त्यामुळे हे सब स्टेशन उभारण्यास माझा विरोध आहे. पोलिसांनी मला दोन तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवले होते. आयुक्तांकडे वारंवार तक्रार करुनही दखल घेतली जात नाही.”
-
-
पार्कमध्ये येणाऱ्या नागरिकांसोबत उगले यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. याबाबत केडीएमसीचे अधिकारी यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी काही बोलण्यास नकार दिला.