देशभरात सध्या नवरात्री उत्सव साजरा करण्यात येत आहे. नवरात्रात नऊ दिवस दुर्गा देवीची पूजा अर्चना करण्यात येते. सोबतच काही लोक या नऊ दिवसांमध्ये उपवास करतात.
या नऊ दिवसांच्या उपवासात लोक सात्विक जेवण करतात ज्यामुळे बॉडी डिटॉक्स होण्यास मदत होते.
तसं बघता वजन कमी करण्यासाठी उपवास अत्यंत चांगला उपाय आहे. त्यामुळे खाण्या-पिण्यावर योग्य लक्ष दिलं तर येणारे सण तुम्हाला फिट ठेऊ शकतात.
तुम्हाला फिट राहायचं असेल तर डायट प्लॅन तयार करा, डायट प्लॅन बनवताना लक्षात असू द्या त्यात कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट आणि फायबर योग्य प्रमाणात असावं.
शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी नारळ पाणी, फळांचा रस, निंबू पाणी सतत घेत राहावं.
कॅफेन शरीराला डिहायड्रेट करतं त्यामुळे उपवासादरम्यान चहा, कॉफी घेणं टाळावं.
दिवसभरात थोडं-थोडं खात राहावं. यामुळे शरीरातील साखर नियंत्रणात राहते.