सध्या सेलिब्रिटींच्या मुलांची म्हणजेच स्टार किड्सची जोरदार चर्चा आहे.
अभिनेत्री जाह्नवी कपूरची बहीण खुशी कपूरसुद्धा तिच्या लुकमुळे चर्चेत नेहमी चर्चेत असते. आतापर्यंत स्वत:ला प्रसिद्धीपासून दूर ठेवण्यासाठी खुशी कपूर नेहमी प्रयत्न करायची. मात्र आता प्रथमच तिनं तिचं इंस्टाग्राम अकाउंट सार्वजनिक केलं आहे.
ती अभिनेत्री जान्हवी पेक्षा जास्त सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते.
खुशीच्या बॉलिवूड पदार्पणाची चर्चा गेले अनेक दिवस सुरू आहे. मात्र अध्यापही अशी कुठली घोषणा खुशीनं केलेली नाही.
मात्र आता खुशीनं प्रथमच तिचं इंस्टाग्राम अकाउंट सार्वजनिक केलं आहे, त्यामुळे आता खुशी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार अशी चर्चा रंगू लागली आहे.