अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Advani) सध्या तिच्या 'लक्ष्मी बॉम्ब' या सिनेमामुळे सध्या चर्चेत आहे. या चित्रपटातील 'बुर्ज खलीफा' हे गाणं सोशल मीडियावर चांगलंच गाजत आहे. अशातच नवरात्रीमध्ये तिचा देसी लुक सगळ्यांवर भूरळ पाडत आहे.
कियारानं आपल्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. तिनं रॉ सिल्कची साडी नेसलेली आहे.
कियाराचा हा लुक परफेक्ट फेस्टिव्हल लुक असल्याची चर्चा आहे. तिनं या साडीसोबत गोल्ड चोकर नेकलेस परिधान केलं आहे.
सोबतच तिनं रेड बेरी लिपस्टिक आणि हलकं मेकअप केलं आहे.
कियाराचा इथिनिक वेअर लुक नेहमीच तिच्या चाहत्यांना आवडतो.