Kidney Stone: किडनी स्टोनचा त्रास असेल तर ‘ही’ फळं खाणे टाळा
किडनी आपले रक्त शुद्ध ठेवण्याची आणि आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्याचे काम करते. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी किंवा अन्य कारणांमुळे किडनी स्टोन (मूतखडा) होऊ शकतो. अशी परिस्थितीमध्ये पोटॅशिअम, सोडिअम, फॉस्फोरस यासारख्या घटकांचे अतिसेवन टाळले पाहिजे.
1 / 5
खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी किंवा अन्य कारणांमुळे किडनी स्टोन (मूतखडा) होऊ शकतो. जर तुम्हाला किडनी स्टोनचा त्रास असेल तर तुम्ही पोटॅशिअम, फॉस्फोरस आणि सोडिअम यांचे अतिसेवन टाळले पाहिजे. अशा परिस्थितीत तुम्ही कोणत्या फळांचे सेवन करू नये ते जाणून घेऊया.
2 / 5
केळ खाऊ नका : केळं हे कॅल्शिअम आणि पोटॅशिअमचा उत्तम स्रोत आहे आणि त्यात नैसर्गिक साखरही जास्त असते. किडनी स्टोन आणि मधुमेहाच्या रुग्णांनी याचे कमी प्रमाणात सेवन करावे.
3 / 5
ॲव्होकॅडो : या परदेशी फळामध्ये सोडिअम आणि फॉस्फरस आढळत नाही, परंतु ते पोटॅशिअमचा सर्वोत्तम स्त्रोत मानले जाते. किडनी स्टोन असेल तर ॲव्होकॅडो खाण्याची चूक करू नका.
4 / 5
किवी खाणे टाळा : तुम्हाला माहिती आहे का की किवीच्या सेवनाने किडनीच्या समस्या वाढूही शकतात. खरंतर त्यामध्ये ऑक्सलेट असते, किडनी स्टोनचा त्रास असेल तर त्याचे सेवन करणे आरोग्यासाठी चांगले मानले जात नाही.
5 / 5
संत्रं : हिवाळ्यात मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी तर असतेच पण ते पोटॅशिअमचा उत्तम स्त्रोत देखील आहे. जर तुम्हाला किडनी स्टोन असेल तर संत्रं किंवा त्याचा रस, यांचे अतिशय थोड्या प्रमाणात सेवन करावे.