KK : प्रेमासाठी सेल्समन ते महान गायक; केकेच्या ‘या’ खास गोष्टी माहित्ये का?
केके यांनी एका मुलाखतीत आपल्या लग्नाचा खास किस्सा सांगितला होता,त्यांनी 1991 मध्ये आपली लहानपणीची खास मैत्रीण ज्योती लक्ष्मी कृष्णासोबत लग्न केले होते. तिच्याशी लग्न करण्यासाठी केकेने सेल्समनची नोकरी केली होती.
1 / 7
बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध पार्श्वगायक कृष्णकुमार कुन्नाथ (केके) यांचे वयाच्या ५३ वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. कोलकाता येथे लाइव्ह कॉन्सर्टमध्ये सहभागी झाल्यानंतर केके यांना हृदयविकाराचा झटका आला.
2 / 7
केके यांनी त्यांचे वैयक्तीक आयुष्य जगमगाटी दुनियेपासून व प्रसिद्धीपासून कायम दूर ठेवले. त्यामुळे त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चाहत्यांना खूपच कमी माहिती असलेली दिसून येते.
3 / 7
केके यांनी एका मुलाखतीत आपल्या लग्नाचा खास किस्सा सांगितला होता,त्यांनी 1991 मध्ये आपली लहानपणीची खास मैत्रीण ज्योती लक्ष्मी कृष्णासोबत लग्न केले होते. तिच्याशी लग्न करण्यासाठी केकेने सेल्समनची नोकरी केली होती.
4 / 7
त्या मुलाखतीत बोलताना केके म्हणाले होते की, केकेची ज्योतीशी पहिली भेट सहावीत झाली होती.मला माझ्या मैत्रिणीशी लग्न करायचे होते मात्र माझ्याकडे पैसे नव्हते. जॉब नव्हता त्यामुळे मी सेल्समनची नोकरी करण्यास सुरुवात केली.
5 / 7
माझ्या सासू सासऱ्यांनी मला तुला जॉब असेल तरच मुलगी देणार असे सांगितल्याने , मी नोकरी शोधण्यास सुरुवात केली. त्यानुसार मला नोकरी मिळाल्यानंतर त्यांनी माझे लग्न लावून दिले.
6 / 7
केके यांचा 1999 मध्ये पहिला संगीत अल्बम आला. त्यानंतर केके यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. केकेने दीर्घकाळ आपल्या आवाजाच्या जादूने बॉलिवूडवर राज्य केले.
7 / 7
केके यांच्या अचानकपणे झालेल्या मृत्यूने देशभरतील चाहत्यांना, संगीत प्रेमींना मोठा धक्का बसला आहे. सोसोशल मीडियावर अनेकांनी पोस्ट करतादुःख व्यक्त केलं आहे.