‘द कपिल शर्मा शो’मध्ये ‘चंदू चायवाला’ या भुमिकेने घराघरात आपली हक्काची जागा बनवणारा अभिनेता चंदन प्रभाकर (Chandan Prabhakar) हा सध्या पंजाबमध्ये आहे. चंदन कुटुंबावरील आपत्तीमुळे खूप त्रस्त झाला आहे. चंदन प्रभाकरच्या मामाला कोरोनाची लागण झाली होती. ज्यामुळे संपूर्ण कुटुंब हादरून गेले होते.
यावर बोलताना चंदन म्हणतो, त्याचे मामा बर्याच दिवसांपासून रुग्णालयात दाखल होते. मामाच्या काळजीमुळे मी सर्वांपासून अंतर ठेवले होते. काहीच दिवसांपूर्वी काका निगेटिव्ह होऊन घरी परत आले आहेत.
या दरम्यान मी माझा फोन बंदच ठेवला होता. आता मी लोकांना त्यांच्या मेसेज आणि कॉलचे उत्तर देणार आहे. संपूर्ण कुटुंब आता मोकळा श्वास घेत आहे, असे चंदन म्हणाला. लॉकडाऊनमध्ये सध्या तो घरातच असून, कुटुंबाला वेळ देत आहे
कपिल शर्माच्या या करिअर प्रवासात सुरुवातीपासून चंदन प्रभाकर एकत्र होत. कपिलच्या शोमध्ये कॉमेडी किंगचा बालपणीचा मित्र अर्थात चंदन ‘चंदू चायवाले’ म्हणून कास्ट झाला होता. चंदनने लोकांच्या हृदयात आपले स्थान निर्माण केले.
कपिल स्ट्रगल करत असल्याच्या दिवसापासून कपिल आणि चंदन एकत्र होते आणि दोघांनी एकत्र अमृतसर या शहरातून आपला प्रवास सुरू केला होता.
कपिल आणि चंदन लाफ्टर चॅलेंजमध्ये देखील एकत्र दिसले होते. 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज'च्या सीझन मध्ये तो दुसर्या क्रमांकावर होता. तथापि, यादरम्यान कपिलचे काही स्टार्सशी भांडण चालू होते की, तेव्हाच चंदन देखील शोमधून गायब झाला होता. पण काही दिवसांपूर्वीच चंदन आपली मैत्री अजूनही तशीच असल्याचे सिद्ध केले होते.