Randeep Hooda : कधी वेटर तर कधी टॅक्सी ड्रायव्हर… बॉलिवूडच्या या स्टारने शिक्षणासाठी काय नाही केलं ?
Most Educated Bollywood Actor : एखादा कलाकार कोणत्याही डिग्री डिप्लोमावर अवलंबून नसतो. बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत, जे अप्रतिम अभिनेते आहेत, पण त्यासोबतच त्यांनी अभ्यासातही उत्तम कामगिरी केली आहे. आज अशाच एका बॉलिवूड स्टारची बद्दल जाणून घेऊया, ज्याने शिक्षणासाठी विविध काम केली.
1 / 6
बॉलिवूडचा प्रसिद्ध स्टार रणदीप हुड्डा (Randeep Hooda)हा एक उत्तम अभिनेता आहे, यात काहीच वाद नाही. 20 ऑगस्ट 1976 रोजी हरियाणातील रोहतक जिल्ह्यात त्याचा जन्म झाला. त्याचे कुटुंबाचा सिनेसृष्टीशी निगडीत नाही. तरीही तो आजचा आघाडीचा अभिनेता आहे. त्याचा हा प्रवास खूप रंजक आहे. ( Photo : Instagram)
2 / 6
रणदीपचे वडील मेडिकल सर्जन असून त्याची आई एक सामाजिक कार्यकर्ता आहे. त्याची मोठी बहीण डॉक्टर आहे, तर धाकटा भाऊ सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे.
3 / 6
रणदीपने आपले शालेय शिक्षण हरियाणातील मोतीलाल नेहरू स्कूल ऑफ स्पोर्ट्स, बोर्डिंग स्कूल येथून पूर्ण केले. तो अनेक खेळांत भाग घेत असे, तसेच त्याने खेळांमध्ये राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारही पटकावले. पुढे त्याचा कल रंगभूमीकडे वळू लागला. पण त्याने डॉक्टर बनावे अशी त्याच्या कुटुंबियांची इच्छा असल्याने तो दिल्ली पब्लिक स्कूल येथे पुढील शिक्षणासाठी गेला.
4 / 6
ग्रॅज्युएशसाठी तो ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे गेला. तेथून त्याने मार्केटिंगमध्ये पदवी घेतली. एवढेच नव्हे तर त्याने ह्युमन रिसोर्समधून एमबीएही केले.
5 / 6
ऑस्ट्रेलियात राहणे त्याच्यासाठी फार सोपं नव्हतं. तिथे टिकून राहण्यासाठी टॅक्सी ड्रायव्हर, वेटरपासून ते कार धुण्यापर्यंतची अशी अनेक कामे करावी लागली, असे रणदीपने एका मुलाखतीत नमूद केले.
6 / 6
भारतात परत आल्यावर त्याने काही काळ मार्केटिंग डिपार्टमेंटमध्ये काम केले. नंतर मॉडेलिंगला सुरूवात केली आणि थिएटरमध्येही काम केले. तेव्हा मीरा नायर यांच्याशी त्याची ओळख झाली आणि त्याचा चित्रपटसृष्टीतील प्रवास सुरू झाला.